Tuesday, 10 October 2017

नांदेड-वाघाळा #पालिकेच्या निवडणुक मतदान 2017



नांदेड-वाघाळा महानगपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (ता.11) मतदान होत असून #81जागांसाठी #578 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक #2 मध्ये प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर केला जाणार आहे. मतदानासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.

महापालिकेच्या एकूण #20प्रभागांतील #81 जागांसाठी मतदान होणार आहे. एकूण #891 उमेदवारांनी वैध नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्यातील #313 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आता #578 उमेदवार आहेत. #व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये 26 उमेदवार आहेत. 11 ऑक्टोबर 2017रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 12 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होईल.

एकूण 20 पैकी 19 प्रभाग चार सदस्यांचे आहेत. एक प्रभाग सदस्यांचा आहे. एकूण 3 लाख 96 हजार 872 मतदार असून त्यांच्यासाठी 550 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग क्र.2वगळता अन्य सर्व प्रभागांतील एका मतदान केंद्रावर सरासरी734 मतदार असतील. व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्र.2 मध्ये मतदारांची एकूण संख्या 20हजार 307 इतकी आहे. त्यांच्यासाठी 37 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. या प्रभागात एका मतदान केंद्रावर सरासरी 550 मतदार असतील.

Sunday, 10 September 2017

सोंवळ्या ओंवळ्या राहिलो निराळा, पासुनी सकळा अवघ्या दुरी!


सोंवळ्या ओंवळ्या राहिलो निराळा, पासुनी सकळा अवघ्या दुरी!
श्री जंगली महाराज हे नाव महाराष्ट्राच्या संतमंडळात प्रख्यात आहे. जंगली महाराज हे मध्ययुगीन संत. जंगली महाराज या नावावरुन ते कोणत्या धर्माचे वा कोणत्या पंथाचे होते, याची काहीच कल्पना येत नाही. हे नाव इतके रूढ झालं आहे की, ते आपलेच संत आहेत, असे विविध धर्मांच्या आणि पंथांच्या लोकांना वाटते आणि यातच त्यांचे खर संतत्व दडले आहे. जंगली महाराज म्हटले की, ते पुण्याचेच अशीही एक सर्वसामान्य समजूत आहे. तीही चुकीची आहे, असे म्हणता येणार नाही, कारण महाराजांचे वास्तव्य बराच काळ पुण्यातच होते आणि त्यांचे बरेचसे कार्यही पुण्यातच झाले आहे.
 जंगली महाराज हे अलीकडील काळातील संत असूनही त्यांच्या जीवनचरित्राचा फारसा तपशील जनसामान्यांना माहित नव्हता. तो उपलब्ध करून घेण्यासाठी पुण्यातील उत्कृष्ट चित्रकार डी. डी. रेगे यांनी जवळपास एक तपभर संशोधन करून जणू एक तपचे केले. त्यासाठी ते महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील विविध विभागात गेले. त्यांच्या शिष्यप्रशिष्यांना भेटले, त्यांच्या घराण्यातील लोकांना भेटले, अनेक उर्दू, फार्सी, मोडी दस्तावेजांचा त्यांनी धांडोळा घेतला. सुप्रसिद्ध इतिहास-संशोधक डॉ. ग. ह. खरे यांच्यासारख्या चिकित्सक अभ्यासकांशी चर्चा केली. जंगली महाराज हे मुस्लिम संत होते. त्यांचे मूळ नाव जंगली शहा. त्यांच्या शिष्यांमध्ये आणि भक्तांमध्ये अनेक जातीधर्मांचे लोक आहेत. मोहंमदशहा कादरी यांनाच जंगली शहा असे म्हणत असत. महाराष्ट्रातील बहुतेक सूफी संत हे कादरी या शाखेचेच होते. या संदर्भात योगसंग्रामाचे कर्ते शेख मोहंमद, सिद्धांतबोधाचे कर्ते शहामुनी, नागेश संप्रदायाचे आलमखान, मुंतोजी बामणी यांचा उल्लेख करता येईल.
जंगली शहा यांचे जन्मगाव सोलापूर जवळील होनमूर्गी हे लहानस खेड आहे. हिंदू इस्लाम आणि वीरशैव अशा वेगवेगळ्या धर्माचे लोक या गावात शतकानुशतके गुण्यागोविंदाने नांदत आहेत. होनमूर्गीचे कुलदैवत बसवेश्वर हे आहे. तिथे जसे बसवेश्वराचे मंदिर आहे त्याचप्रमाणे मेहबूब सुसानी या पीरांचा दर्गाही आहे. जंगलीशहा हे बालपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धीचे होते. मराठी, कन्नड, उर्दू आणि फार्सी या भाषा त्यांनी बालपणापासूनच आत्मसात केल्या होत्या. त्यांची प्रवृत्ती धार्मिक असल्यानं त्यांनी वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास केला.
हजरत शहा ताहेर कादरी सत्तारी हे त्यांचे मुस्लिम गुरू होते. अक्कलकोटच्या परिसरात महान धर्मगुरू म्हणून ते मानले जात. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे ताहिरशहांचे समकालीन होते. ते दत्तोपासक होते. जंगलीशहा सर्वसंग-परित्याग करून विरक्त झाले. त्यांनी विजापूर, कुडची, जमखंडी, मिरज, नरसोबाची वाडी, रेठरे आणि नेर्ले अशा विविध ठिकाणी वास्तव्य केलं व लोकहिताची अनेक कामं करायला प्रारंभ केला. वेगवेगळ्या धर्मपंथातील लोकांचा त्यांचा शिष्य-परिवार वाढत वाढत चालला.
 त्यांनी जागोजाग धर्मशाळा, मंदिरं, मशिदी, दर्गे, घाट इत्यादी असंख्य बांधकामं केली व त्यांची नीट व्यवस्था लावून दिली. उत्तरायुष्यात ते पुण्याला आले व तिथंही त्यांनी लोकहिताची कामं केली. कीर्तन-प्रवचनांच्या माध्यमातून जनसामान्यांवर उदात्त संस्कार केले. इ.स. १८९० च्या प्रारंभी महाराजांची प्रकृती खालावली. त्या काळातही ते योगसाधना करीत असत. आपल्या आयुष्याच्या सायंकाळीची चाहूल लागली असल्यानंच जणू भांबुडरयाच्या टेकडीवर आपल्या समाधीची जागा त्यांनी निश्चित करून ठेवली होती. ४ एप्रिल १८९० रोजी महाराजांनी आपली इहलोकींची यात्रा संपविली.
परें परतें मज न लगे सांगावें, हें तो बरे देवे शिकविले!!
दुसऱ्यातें आम्ही नाही आतळत, जाणोनी संकेत उभा असे!!

Saturday, 9 September 2017

सोंवळ्या ओंवळ्या राहिलो निराळा


सोंवळ्या ओंवळ्या राहिलो निराळा, पासुनी सकळा अवघ्या दुरी!
श्री जंगली महाराज हे नाव महाराष्ट्राच्या संतमंडळात प्रख्यात आहे. जंगली महाराज हे मध्ययुगीन संत. जंगली महाराज या नावावरुन ते कोणत्या धर्माचे वा कोणत्या पंथाचे होते, याची काहीच कल्पना येत नाही. हे नाव इतके रूढ झालं आहे की, ते आपलेच संत आहेत, असे विविध धर्मांच्या आणि पंथांच्या लोकांना वाटते आणि यातच त्यांचे खर संतत्व दडले आहे. जंगली महाराज म्हटले की, ते पुण्याचेच अशीही एक सर्वसामान्य समजूत आहे. तीही चुकीची आहे, असे म्हणता येणार नाही, कारण महाराजांचे वास्तव्य बराच काळ पुण्यातच होते आणि त्यांचे बरेचसे कार्यही पुण्यातच झाले आहे.
 जंगली महाराज हे अलीकडील काळातील संत असूनही त्यांच्या जीवनचरित्राचा फारसा तपशील जनसामान्यांना माहित नव्हता. तो उपलब्ध करून घेण्यासाठी पुण्यातील उत्कृष्ट चित्रकार डी. डी. रेगे यांनी जवळपास एक तपभर संशोधन करून जणू एक तपचे केले. त्यासाठी ते महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील विविध विभागात गेले. त्यांच्या शिष्यप्रशिष्यांना भेटले, त्यांच्या घराण्यातील लोकांना भेटले, अनेक उर्दू, फार्सी, मोडी दस्तावेजांचा त्यांनी धांडोळा घेतला. सुप्रसिद्ध इतिहास-संशोधक डॉ. ग. ह. खरे यांच्यासारख्या चिकित्सक अभ्यासकांशी चर्चा केली. जंगली महाराज हे मुस्लिम संत होते. त्यांचे मूळ नाव जंगली शहा. त्यांच्या शिष्यांमध्ये आणि भक्तांमध्ये अनेक जातीधर्मांचे लोक आहेत. मोहंमदशहा कादरी यांनाच जंगली शहा असे म्हणत असत. महाराष्ट्रातील बहुतेक सूफी संत हे कादरी या शाखेचेच होते. या संदर्भात योगसंग्रामाचे कर्ते शेख मोहंमद, सिद्धांतबोधाचे कर्ते शहामुनी, नागेश संप्रदायाचे आलमखान, मुंतोजी बामणी यांचा उल्लेख करता येईल.
जंगली शहा यांचे जन्मगाव सोलापूर जवळील होनमूर्गी हे लहानस खेड आहे. हिंदू इस्लाम आणि वीरशैव अशा वेगवेगळ्या धर्माचे लोक या गावात शतकानुशतके गुण्यागोविंदाने नांदत आहेत. होनमूर्गीचे कुलदैवत बसवेश्वर हे आहे. तिथे जसे बसवेश्वराचे मंदिर आहे त्याचप्रमाणे मेहबूब सुसानी या पीरांचा दर्गाही आहे. जंगलीशहा हे बालपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धीचे होते. मराठी, कन्नड, उर्दू आणि फार्सी या भाषा त्यांनी बालपणापासूनच आत्मसात केल्या होत्या. त्यांची प्रवृत्ती धार्मिक असल्यानं त्यांनी वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास केला.
हजरत शहा ताहेर कादरी सत्तारी हे त्यांचे मुस्लिम गुरू होते. अक्कलकोटच्या परिसरात महान धर्मगुरू म्हणून ते मानले जात. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे ताहिरशहांचे समकालीन होते. ते दत्तोपासक होते. जंगलीशहा सर्वसंग-परित्याग करून विरक्त झाले. त्यांनी विजापूर, कुडची, जमखंडी, मिरज, नरसोबाची वाडी, रेठरे आणि नेर्ले अशा विविध ठिकाणी वास्तव्य केलं व लोकहिताची अनेक कामं करायला प्रारंभ केला. वेगवेगळ्या धर्मपंथातील लोकांचा त्यांचा शिष्य-परिवार वाढत वाढत चालला.
 त्यांनी जागोजाग धर्मशाळा, मंदिरं, मशिदी, दर्गे, घाट इत्यादी असंख्य बांधकामं केली व त्यांची नीट व्यवस्था लावून दिली. उत्तरायुष्यात ते पुण्याला आले व तिथंही त्यांनी लोकहिताची कामं केली. कीर्तन-प्रवचनांच्या माध्यमातून जनसामान्यांवर उदात्त संस्कार केले. इ.स. १८९० च्या प्रारंभी महाराजांची प्रकृती खालावली. त्या काळातही ते योगसाधना करीत असत. आपल्या आयुष्याच्या सायंकाळीची चाहूल लागली असल्यानंच जणू भांबुडरयाच्या टेकडीवर आपल्या समाधीची जागा त्यांनी निश्चित करून ठेवली होती. ४ एप्रिल १८९० रोजी महाराजांनी आपली इहलोकींची यात्रा संपविली.
परें परतें मज न लगे सांगावें, हें तो बरे देवे शिकविले!!
दुसऱ्यातें आम्ही नाही आतळत, जाणोनी संकेत उभा असे!!

Sunday, 23 July 2017

भक्तीनिष्ठ ‘संत वेणाबाई’

भक्तीनिष्ठ ‘संत वेणाबाई


बहू कष्टलो पातलो जी स्वदेशा !
प्रजा बोलती कौल दे राघवेशा !!
संत वेणाबाई यांचा जन्म इ.स. १६२७ मध्ये झाला. त्या मुळच्या मिरज येथील देशपांडे यांच्या कन्या. विवाहानंतर कोल्हापूरला गेल्या व काही काळातच, वयाच्या दहाव्या वर्षी विधवा झाल्या. तेथेच त्यांनी समर्थ रामदासांचे शिष्यत्व स्वीकारले. नंतर त्या मिरज येथे परत आल्या. समर्थांनी त्यांना कीर्तन करण्याची अनुमती दिली होती. त्या मध्ययुगीन काळात विधवा स्त्रीने कीर्तन करणे ही एक क्रांतीच होती. मळलेली वात सोडून समाजाच्या उद्धारासाठी क्रांतिकारक पाऊल उचलणाऱ्या सर्वच संतांना जननिन्देला सामोरे जावे लागते. समर्थ त्याला अपवाद नव्हते. वेणाबाई, अक्काबाई,अंबिकाबाई या स्त्रियांना त्यांनी अभ्यासास प्रवृत्त केले. वेणाबाईंना तर खूप त्रास सहन करावा लागला. त्यांचे समर्पण म्हणजे एक कसोटीच होती. कोल्हापूर हे त्यांचे माहेर तर मिरज हे सासर होते. समर्थ मिरजेला आणि कोल्हापूरला नेहमी जात. तिथे त्यांची नेहमी कीर्तने होत. वेणाबाई त्यांच्या कीर्तनांना आवर्जून जात. सासू-सासरे एकनाथ महाराजांचे अनुगृहीत होते. त्यामुळे घरातून कोणताच विरोध नव्हता.

समर्थ प्रत्येक रामनवमी उत्सवाच्या आधी निवडक शिष्य घेऊन भिक्षेसाठी जात असत. त्या काळात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला चाफळात ठेऊन उत्सवाची सर्व जबाबदारी त्याच्यावर सोपविली जात असे. एक वर्ष ही जबाबदारी वेणास्वामींच्यावर सोपविण्यात आली. नेतृत्वाचे गुण प्रत्येक माणसामध्ये असतात. विशिष्ट पद्धतीने त्याचा विकास घडवून आणावा लागतो. वेणाबाईंनी मठाची जबाबदारी स्वीकारली. समर्थांनी पाठवलेली भिक्षा कोठीघरात व्यवस्थित लावून ठेवणे अशी विविध कामे करावी लागत. रामरायाची ही सेवा वेणाबाई मनापासून करीत असत. त्यांना त्यांच्या सेवेची पावती द्यावी, असे रामचंद्रांच्या मनात येऊन गेले. ऐन उत्सवाच्या १५ दिवस आधी वेणाबाई आजारी पडल्या. त्या तापाने एवढ्या फणफणल्या की, त्यांना चालताही येईना. ज्याप्रमाणे नाना रूपे धारण करून संत जनाबाई, संत एकनाथ या संतांची सेवा केली त्याप्रमाणे रामचंद्रांनी रामबाईंच्या रूपात येऊन उत्सवाची सर्व तयारी केली. मी बत्तीस शिराळ्याची असून रामदास स्वामींनी मला तुमच्या मदतीसाठी पाठविले आहे, असे रामाबाईंनी वेणाबाईंना खोटेच सांगितले. समर्थ भिक्षेहून परतल्यावर सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि रामाबाई ही गुप्त झाल्या.

वेणाबाईंची समाधी सज्जनगड येथे आहे. रामदासस्वामींनी इ.स. १६५६ मध्ये बांधलेला वेणाबाईंचा मठ मिरज येथे आहे.‘धन्य वेणाई वेणुमोहित !
वेणुविण गाय सप्रेमयुक्त !!

Saturday, 15 July 2017

भोळी-भाबडी संत सखू

भोळी-भाबडी संत सखू

बा रे पांडुरंगा, केव्हा भेट देसी !!
झाले मी परदेसी, तुजविण !!


कृष्णा नदीच्या तीरावर करवीर नावाचे तीर्थक्षेत्र आहे. फार वर्षांपूर्वी तेथे सखूचे सासर होते. तिच्या पतीचे नाव दिगंबर. तीची सासू सखूला फार त्रास देत असे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिची सासू तिला कामाला जुंपून ठेवी. सारे काम करूनही सासूची बोलणी ही नित्याचीच असत. सखू मात्र हे सारे निमूटपणे सहन करी. भोळी-भाबडी सखू काम करताना नेहमी विठ्ठलाचे स्मरण करी. तिच्या मुखी सारखे पांडुरंगाचेच नाम असे.
एकदा आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीला जाणारी दिंडी तिच्या गावी आली. दिंडी कृष्णेच्या तिरावर थांबली. 

तेथे वारकऱ्यांचे भजन चालू झाले. महाराज कीर्तन करायला उभे राहिले. नेमकी त्याच वेळी सखू नदीवर पाणी भरण्यासाठी आली होती. कीर्तनकार पंढरीचा महिमा वर्णू लागले. पांडुरंगाची थोरवी गाऊ लागले. विठ्ठलनाम कानावर पडताच सखूचे लक्ष तिकडे गेले. महाराजांचे कीर्तन ऐकण्यात ती तल्लीन झाली. सर्व वारकऱ्यांना पाहून तिलाही पंढरीला जावेसे वाटू लागले. तिला विठ्ठलदर्शनाची अनिवार ओढ लागली. त्या निश्चयाच्या भरात सखूने आपली घागर शेजारणीजवळ दिली आणि घरी नेऊन देण्यास सांगितले. ती दिंडीसमवेतच पुढे निघाली. विठ्ठलनामाच्या जयघोषात सखू अगदी दंग झाली.
इकडे शेजारणीने सखूच्या घरी घागर नेऊन दिली. सासूने शेजारणीला विचारले, सखू कुठे गेली ? शेजारणीने सारे वृत्त कथन केले. ते ऐकून सासूला फारच राग आला. संतापाने ती लाल झाली. तिने लगेच आपल्या मुलाला बोलावून घेतले आणि ताबडतोब सखूला घेऊन येण्यास सांगितले. दिगंबराने भराभर चालत जाऊन दिंडी गाठली आणि सखूला मारझोड करतच घरी घेऊन आला. दोघांनी मिळून तिला एका खोलीत कोंडून ठेवले. तिला अन्नपाणीही द्यायचे नाही, असे त्यांनी ठरवले. सखूला वाईट वाटले ते या गोष्टीचे की, आता पांडुरंगाचे दर्शन होणार नाही. तिने पांडुरंगाचा धावा चालू केला. व्याकुळ होऊन ती पांडुरंगाला आळवू लागली.

सखूची निस्सीम भक्ती आणि भोळया भावामुळे पांडुरंग तिच्यावर प्रसन्न झाला. पांडुरंगाचे रूप बघून धन्य धन्य झाली. तिला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले आणि तिथेच तिने आपले प्राण ठेवले. दिंडीस आलेल्या तिच्या गावकऱ्यांनी तिचे अंत्यसंस्कार केले. पंठरीत ज्या गावकऱ्यांनी सखूचे अंत्यसंस्कार केले होते, ते सखूच्या घरी आले, तर सखू त्यांना घरकाम करतांना दिसली. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी सखूच्या नवऱ्याला आणि सासूला सारा वृत्तांत सांगितला. तो ऐकून त्यांनी सखूला खरा प्रकार काय आहे, ते विचारले. सखूने सारी घटना कथन केली. ती ऐकून गावकरी स्तब्ध झाले. तिच्या नवऱ्याला आणि सासूला पश्चात्ताप झाला. अस्या या महान संताची समाधी कराड नगरीत कृष्णा कोयनेच्या पवित्र संगमावर आहे. आजही पंढरपूरला निघालेले वारकरी आवर्जून सखूबाईच्या समाधीचे दर्शन घेतात.

तुजविण सखा, मज कोणी नाही !!
वाटते चरणी, घालावी मिठी !!
ओवाळावी काया, चरणावरोनी !!

Sunday, 9 July 2017

मज हृदयी सद्‍गुरु ...!!

मज हृदयी सद्‍गुरु ...!!


मज हृदयी सद्‍गुरु ! तेणेची तारिलो हा संसारपुरू !!
म्हणोनी विशेषें अत्यादरू ! विवेकावरी।। ज्ञानेश्वरी !!
आपली प्राचीन संस्कृती गुरू-शिष्याच्या परंपरेने हजारो वर्षांपासून जीवंत राहिलेली आहे. संस्कृतीचा प्राण म्हणजे श्रीगुरु-शिष्य परंपराच. वेदकालापासून आपणास ही पवित्र परंपरा ज्ञात आहे. या परंपरेचा स्त्रोत विशेष प्रकर्षाने समाजापुढे आदर्शपणे, वारकरी संप्रदायाने जपून ठेवून तो समाजाच्या तळागाळापर्यंत नेला आहे. आज महाराष्ट्रात 'विठ्ठलभक्ती' प्राधान्याने केली जाते. त्याचा प्रभावी प्रवाह संतकाळापासून दिसून येतो. अनेक शतकापासून ही विठ्ठल भक्ती फोफावलेली आहे. श्रीगुरु परंपरेमुळेच ती समाजात नेऊन रुजवली, फुलविली.
गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुरूदेवांबरोबरच भगवान व्यासांचीही पूजा केली जाते.

 व्यासांचे पूर्ण नाव कृष्णद्वैपायन आहे. वेदांचे विभाग केल्यामुळे त्यांना व्यास किंवा वेदव्यास असे म्हटले जाते. महर्षि पाराशर व्यासांचे पिता आणि सत्यवती त्यांची आई होती. व्यासांना देवाचा अवतार मानले जात असून ते अमर आहेत. द्वापार युगाच्या शेवटी व्यास प्रकट झाले होते, असे म्हणतात. कलियुगात मनुष्याची शारिरीक आणि बौद्धिक ताकद कमी होईल. त्यामुळे या काळातील मनुष्यप्राण्याला सर्व वेदांचा अभ्यास करणे शक्य होणार नाही. ते समजूनही घेता येणार नाही, हे ओळखून व्यासांनी वेदांचे चार विभाग केले. जे लोक वेद वाचू, समजू शकत नाही त्यांच्यासाठी त्यांनी महाभारत लिहिले.
महाभारतात वेदाची सर्व माहिती आहे. धर्मशास्त्र, नितीशास्त्र, उपासना आणि ज्ञान-विज्ञानाच्या सर्व बाबी महाभारतामध्ये आहेत. याव्यतिरिक्त पुराणांमधील कथांद्वारे आपला देश, समाज किंवा धर्माचा पूर्ण इतिहास समजतो. महाभारताच्या कथा मोठ्या रोचक आणि उपदेशात्मक आहेत.
मनुष्याचे कल्याण व्हावे, या भावनेतून व्यासांनी अठरा पुराणांची रचना केली. पुराणात देवांची सुंदर चरित्रे आहेत. भाविकांच्या देवांप्रती असलेल्या भक्तीच्या कथा पुराणात आहेत. या व्यतिरिक्त व्रत, विधी, तीर्थक्षेत्रांचे माहात्म्य, ज्ञान, वैराग्य, भक्ती, नीती आदी विषयांनी पुराण भरले आहे.

हिंदू धर्माची सर्व अंगे व्यासांनी पुराणात सामावली आहेत. विद्वानांसाठी त्यांनी वेदांत दर्शनाची रचना केली. वेदांत दर्शन लहान-लहान सूत्रात असून ते इतके अवघड आहे की, त्यांचा अर्थ समजण्यासाठी मोठे ग्रंथ लिहिले गेले आहेत. या त्यांच्या कर्तृत्वामुळे गुरूपौर्णिमेच्या दिवशी व्यासांची पूजा केली जाते.

Tuesday, 4 July 2017

पंढरपुरीचा निळा

पंढरपुरीचा निळा..!!
(लेखक- -पुष्कर म. गोसावी जहागीरदार ,संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज )



पंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा 
विठो देखियेला डोळां बाईयेवो ॥
पंढरपूर हे भीमा नदीच्या काठावर वसलेले शहर आहे. शहराला अर्धचंद्राच्या आकाराने भीमा नदीने वळसा घेतलेला आहे, म्हणून या नदीला चंद्रभागा असेही म्हटले जाते. त्याच्यामागेही मोठी अख्यायिका आहे. वारकरी संप्रदायात या नदीला चंद्रभागा या नावानेच ओळखले जाते.  संतांच्या अभंगातूनही या नदीचे वर्णन चंद्रभागा किंवा भिवरा असेच केल्याचे दिसून येतय. अशा या पंढरपूरचा उल्लेख प्राचीन ग्रंथातही सापडतो. शालिवाहन राजांच्या काळात इ.स. ८३  मध्ये या शहराचे संवर्धन केल्याचे दाखले सापडतात. तर इ.स ५१६ मध्ये राष्ट्रकुटांच्या काळातही पंढरपूरचा उल्लेख आढळून येतो. पंढरपूर अत्यंत प्राचीनकाळापासून असल्याचे अनेक दाखले सापडतात. तो इतिहासाचा विषय आहे.
 त्यावर जास्त लिहित नाही. इतिहासातल्या थोर व्यक्तिमत्त्वांनीही या पंढरपूरला भेट दिल्याचे दाखले आहेत. ग्वाल्हेरचे शिंदे, बाजीराव पेशवे, अहिल्यादेवी होळकर यांच्यासह अनेक राजे महाराजे आणि सरदारांनी या विठ्ठलाला मौल्यवान दागिने अर्पण केलेले आहेत. हिरे, माणिक, मोती, सोनं या दागिन्यांचा खजाना आजही मंदिराच्या विश्वस्तांकडे आहे. यावरूनच हे दैवत किती प्राचीन आहे याची प्रचिती येते
.
भीमानदीच्या काठावरच विठ्ठल रुखमाईचे भव्य मंदिर आहे. सोलापुरातून तुम्ही गोपाळपूरच्या जुन्या दगडी पुलाच्या मार्गाने जर पंढरपुरात प्रवेश केला तर तुम्हाला लांबूनच कळसाचे दर्शन होते. मंदिराच्या समोरच नामदेव पायरी आहे. विठोबाचे दर्शन घेण्याअगोदर नामदेव पायरीचे दर्शन घेतले जाते. तर मंदिराच्या अगदी समोर नदीपात्रात पुंडलिकाचे मंदिर आहे. या दोन्हीबद्दल वारकरी साहित्यात मोठी माहिती देण्यात आलेली आहे. पंढरपूरला येणाऱ्या भक्तांना वारकरी म्हणतात. या वारकरी संप्रदायात तुळसीची माळ घालण्याची परंपरा आहे. त्यांना माळकरीही म्हणतात. काळा बुक्का हा विठ्ठलाच्या नावाने कपाळी लावला जातो.

 पंढपुरात आलेला वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतो. सध्या सगळ्याचे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणच्या नद्यांची जी अवस्था आहे. तीच या भीमानदीचीही झालेली आहे. प्रदूषणाने नदीचे पाणी गढूळ झालय. पण वारकरी या नदीत डुबकी मारूनच विठोबाचे दर्शन घेतात.

उदंड पाहिली उदंड ऐकिली । उदंड वर्णिली क्षेत्र ख्याती ॥१॥
ऐसी चंद्रभागा ऐसें भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठें ॥२॥

मी पंढरीचा वारकरी...!!

मी पंढरीचा वारकरी...!!



पंढरीशी जारे आल्यानो संसारा,  दिनाचा सोयरा पांडुरंग !

वाट पाहे उभा भेटीशी आवडी,  कृपाळू तातडी उतावीळ !
ज्ञानेश्वरीमध्ये ‘वारी’ म्हणजे येरझारा. वारकरी संप्रदायात पंढरीच्या वारीला महत्त्व आहे. वर्षातून एकदा वारकऱ्याने पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घ्यावे; असा नियम आहे. गळ्यांत तुळशीमाळा, कपाळी बुक्का, कानाच्या दोन्ही पाळ्यांना गोपीचंदन, खांद्यावर पताका आणि हातात टाळ-मृदुंग अशा थाटात वारकरी वारीला जाताना दिसतात. पंढरपूरच्या वारीचा हा सोहळ. अभूतपूर्व असतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे ते एक अंग आहे. पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांतून हा सोहळा चालतो. याचे नियोजन ज्ञानेश्वर संस्थानातर्फे केले जाते. दरवर्षी ज्येष्ठ वदय अष्टमीला आळंदीहून विधिपूर्वक पालखीचे प्रस्थान होते.

 आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपूरात तिचे आगमन होते. आषाढ पौर्णिमेपर्यंत पंढरपूरात माऊलीचा उत्सव असतो. आषाढ वद्य एकादशीला पालखीचा परतीचा प्रवास सुरू होऊन आषाढ वदय दशमीला पालखी आळंदीला परत येते. वारीच्या मध्यभागी ज्ञानदेव माऊलीच्या चांदीच्या पादुका ठेवलेला रथ असतो. रथापुढे मानाच्या सत्तावीस दिंड्या असतात. मान्यता मिळालेल्या अन्य दिंड्या रथाच्या मागे असतात अर्थात पहिली दिंडी माऊलीची असते. भजन कीर्तन करीत वारकरी मार्गस्थ होत असतात. 


वारीची ही एक पदयात्राच असते तिचा मार्ग ठरलेला, मुक्काम ठरलेले असतात. ठरावीक मुक्कामाच्या ठिकाणी, माऊलींच्या घोड्यांची रिंगणे होतात. पहिले उभे रिंगण ‘चांदोबाचा लिंब’ येथे, लोठांद- तरडगांव या मार्गावर होते. दुसरे गोल रिंगण ठाकूरबुवांच्या समाधीजवळ, भंडी -शेगाव या गावाजवळ खुडसफाटा येथे होते. वाखरी पंढरपूर या गावाजवळ शेवटची रिंगणे होतात. वाटेत माऊलीच्या पादुकांना नीरा नदीत स्नान व पौर्णिमेला स्नानानंतर विठ्ठल रखुमाई यांच्या चरणी भेट हा महत्त्वाचा कार्यक्रम असतो.
पंढरीच्या वारीची वैशिष्ट्ये :

दिंडी : प्रत्येक दिंडीमध्ये एक वीणेकरी एक पखवाज वादक असतो. दिंडीपुढे पताकाधारी वारकरी असतो.


रिंगण : वारीला पायी जाताना येणारा थकवा जाण्यासाठी एकूण सहा ठिकाणी रिंगण घातली जातात. 

कीर्तन : वारकरी संप्रदायातील कीर्तन परंपरेचे प्रवर्तक संत नामदेव मानले जतात. यापद्धतीत इतर कीर्तनासारखा पूर्वरंग, उत्तररंग, आख्यान असे काही नसते. या कीर्तनात सांप्रदायिक भजनाला प्राधान्य असते. कीर्तनात मृदुंग, टाळ, पखवाज व वीणा एवढी वाद्ये असतात. आणि देव, संत, नाममहात्म्य, गुरुकृपा असेच विषय असतात. सुरवातीला मागे टाळकरी उभे राहून ‘‘सुंदर ते ध्यान’’ हा अभंग म्हणून कीर्तन सुरू करतात. 



Saturday, 24 June 2017

सामाजिक एकतेचे दर्शन ‘पंढरीची वारी’


सामाजिक एकतेचे दर्शन ‘पंढरीची वारी’

संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा !!
जावे पंढरीशी आवडे मनाशी, कई एकादशी आषाढी ये !!

पंढरीच्या वारीला अनेक शतकांची प्रदीर्घ परंपरा आहे. ‘सकळासी येथे आहे अधिकार’ म्हणत वारकरी संतांनी अठरापगड जातीत विखुरलेला समाज विठ्ठलभक्तीच्या उदात्त अशा स्नेहधर्माने चंद्रभागेच्या वाळवंटी एक केला. एकत्र भजन, एकत्र स्वयंपाक, एकत्रित भोजन यामुळे वारकरी आचारधर्मात जाती-वर्णभेदाला स्थानच नाही. येथे जाती नव्हे तर भक्ती प्रमाण मानली गेली. तुका म्हणे नाही जातीसवे काम, ज्या मुखी नाम तोचि धन्य! हे संतवचन वारीतील सामाजिक समतेचे अधिष्ठान आहे. या दृष्टीने वारी म्हणजे समतेचे, समरसतेचे विराट दर्शन आहे. पंढरीची वारी हे सुकृत दर्शनी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठलाच्या उपासनेचे भक्ती-ज्ञानाधिष्ठित व्रत आहे, पण या व्रताची या उपासनेची सामाजिक फलश्रुती विचारात घेता पंढरीची वारी हे सामाजिक समतेचे, एकतेचे आणि समरसतेचे विराट दर्शन आहे.
दरवरर्षी दिंडीत लाखो लोक पायी वारीत सामील होतात. आपले घरदार, कामधंदा सोडून ते पंढरीच्या वाटेवर येतात. हे का येत असावे असा प्रश्न लोक विचारतात. त्यांचेही बरोबर आहे. या दिंडीच्या वाटेवर ना चांगली राहण्याची व्यवस्था, ना झोपण्याची सोय, पण तरीही लक्षावधी जनांचा प्रवाहो एका विठ्ठल नामाच्या मंत्राने प्रवाहित होऊन चालत असतो. त्याच्या चालण्याला ग्यानबा-तुकारामचा ठेका असतो. टाळ- मृदुंगातून उमटणारा जय जय रामकृष्ण हरीचा गजर असतो, त्यामुळे कोणत्याही लौकिक सुविधांची पर्वा करायला त्याच्याकडे वेळच नसतो. वारकऱ्यांचे सारे लक्ष विठ्ठलनामात गुंतलेले असते आणि नामातून, भजनातून, कीर्तनातून मिळणारा आनंद फक्त त्याच्यापुरता नसतो, तर तो अवघ्या आसमंतात साठलेला असतो. दिंडी जसजशी पुढे सरकते तसा सगळीकडे उसळतो विठ्ठल नामाचा नाद-गंध. पावसाच्या शिडकाव्याने सारा परिसर आधीच अभिमंत्रित झालेला, त्यावर एक वर्ख चढवा तद्वत नामाच्या कल्लोळाने चराचरावर एक प्रकारचा हळवा ओलावा पसरलेला असतो.

 रस्त्यावरील माती ज्याच्यासाठी अबीर-गुलाल त्या वारकऱ्यांचा अवघा देह पदोपदी नाचत-गात बोलत असतो. दिंडी ही अशी बेभानपणे अनुभवायची असते, आत्मभान जागवत जगायची असते. वारीत सगळ्याचा विसर पडतो, दिंडीतील प्रत्येक पावलागणिक तुमचे पद, प्रतिष्ठा, परिवार सगळे काही मागे पडत असते, कारण वारकऱ्यांची नजर पंढरीच्या पांडुरंगाकडे लागलेली असते, कानात संतांच्या अभंगवाणीचा गजर घुमत असतो.
वारकऱ्यांचा धर्म अगदी वेगळा आहे. तेथे कर्मकांडाला स्थान नाही. संतांच्या म्हणण्यानुसार जो चांगला वागतो, जगतो तोच वारकरी. मग त्याच्या गळ्यात माळ असो नसो. कारण कपाळी अबीर, चंदन लावल्याने किंवा गळ्यात तुळशीमाळ घातल्याने वैष्णवांच्या मेळ्यात सामील होता येत नाही. तेथे कापरासाख्या निर्मळ मनाची गरज असते.
संसार पसारा, विषयांचा मारा !!
दु:खांचा भारा, माझ्या डोई !! 

Saturday, 17 June 2017

भक्ती प्रेमाचा मेळा ‘पंढरीची वारी’


अवघें जेणें पाप नासे ! तें हें असे पंढरीसी !! 
गात जागा गात जागा ! प्रेम मागा विठ्ठला!! 
अवघी सुखाची च राशी ! पुंडलिकाशीं वोळली हे !! 
तुका म्हणे जवळी आलें ! उभे ठालें समचरणीं!! 

हजारो वारकरी माऊली, दुकोबांच्या सोहळ्यात पंढरीची वाट चालत आहेत. आषाढ म्हटले की, अवघ्या वारकरी संप्रदाय आणि मराठी जणांना आषाढ वारीचे वेध लागतात. देहू आणि आळंदीहून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघताच त्यांच्याबरोबर वारकरी आणि भक्तांचा अथांग सागर टाळ-चिपळ्याच्या निनादात, विठूनामाचा जयघोष करीत पंढरीची वाट धरतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून, परराज्यातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक या वारीत सामील होत असतात. उण, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अनेक चढ-उतार पार करत वारकरी पंढरीची वाट चालत असतो. परंतु, चालताना चालेला विठूनामाचा जयघोष त्यांना स्वर्गीय सुखाची प्राप्ती करून देत असतो. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या वारकऱ्यांना अशा संकटांची तमा नसते. अशी तळमळ, ओढ, प्रेम, निष्ठा दुसरीकडे क्वचितच पाहण्यास मिळत असावी. 
कोणतेही निमंत्रण नाही आग्रह नाही सर्व लोक स्वइच्छेने स्वखुशीने आणि स्वखर्चाने या वारीत सामील होत असतात. एका ध्येयाने इतका मोठा लोकसमूह एकत्र येऊन इच्छित स्थळी सुव्यवस्थितपणे एकमेकांना सहकार्य करत शिस्तीत पोचतो. अाबालवृद्ध, शिक्षित, अडाणी, गरीब, श्रीमंत सर्वच यात सामील होतात.
आषाढी म्हटले, की डोळ्यांसमोर पहिली येते, ती पंढरपूरची वारी ! भक्तीचा उत्सव, भक्त आणि ईश्वर यांचा अनोखा मेळा म्हणजे पंढरपूरची वारी. लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वाट धरतात, विठ्ठल विठ्ठलच्या नामस्मरणाने अवघे पंढरपूर दणाणून जाते, जात, धर्म, भाषा, द्वेष, मत्सर या पलीकडे जाऊन सर्व लोक एकमेकांना ‘माऊली-माऊली’ची हाक देतात. हा अनोखा माऊलीच्या अफाट प्रेमाचा मेळावा बघणाऱ्याचे खरेच डोळ्यांचे पारणे फिटतात असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. आषाढीचा सोहळा म्हणजे महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आळंदी, देहू वरून पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. महाराष्ट्रात बहुसंख्य शेतकरी वर्ग हा खेड्यांपाड्यांतून राहतो आणि त्या वर्गात आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या म्हणजेच पंढपूरच्या प्रेमनगरी वारकरी चंद्रभागेच्या प्रेमात न्हाऊन त्याच्या आणि एकमेव फक्त त्याच्याच असणाऱ्या त्याच्या लाडक्या, प्राणप्रिय सावळ्या विठूमाऊलीच्या प्रेमात आकंठ डुंबून आणि ‘त्या’ सावळ्या परब्रह्माच्या चरणी स्वत:ला झोकून देऊन अमाप प्रेमाची लयलूट तर करतोच पण साठवणही करतो आणि पुढे वर्षभर व्यवहारात वापरतो. हा असतो अक्षय असा त्याच्या परम निधानाचा प्रेमाचा साठा - जो कधीच संपूच शकत नाही.
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे !
क्रोध अभिमान गेला पावतणी, एक एका लागतील पायी रे !!

Sunday, 11 June 2017

आत्मसाक्षात्काराचा सोहळा ‘पंढरीची वारी’

आत्मसाक्षात्काराचा सोहळा ‘पंढरीची वारी’


टाळी वाजवावी गुढी उभारावी,
वाट ती चालावी पंढरीच !!
पंढरीची हाट कौलांची पेठ,
मिळाले चतुष्ट वारकरी!!
पावसाळा सुरू झाला की, आषाढात पालख्यांचे वेध लागतात. आषाढातली ही एकादशी आणि तिची वारी हे वारकऱ्यांचे व्रत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पादुका मिरवत या दिंड्या कैवल्याच्या पुतळ्याला भेटायला येतात. या वर्षी ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान १७ जून, तर तुकाराम महाराज यांचा पालखीचे प्रस्थान १६ जूनला होत आहे. या सोहळ्यासाठी सर्व महाराष्ट्रातून दिंड्या येतात. अगदी कर्नाटकातून, गोव्यातूनही दिंड्या येतात.
वारी हा अध्यात्मिक सुखाचा प्रवाह आहे. वारी हे एक व्रत आहे. संस्कार आहे. अट्टहासाने जोडलेला सद्‍गुण आहे. एकात्मतेची गंगोत्री आहे. वारी हा भगवतभक्तीचा नुसता अविष्कार असून मुक्तीतील आत्मनंदाचा आणि भक्तीतील प्रेमसुखाचा अनुभव आहे. कारण वारकरी हा भागवत संप्रदाय आहे. या संप्रदायाची शिकवण अगदी साधी-सोपी आहे. प्रत्येकाने आपला व्यवसाय करावा, स्वधर्माचे पालन करावे पण हे करताना पांडुरंगाचे स्मरण करावे हीच भक्ती. त्यात कोणी उच्च नीच नव्हते, कोण्या एका जातीचे संत नाहीत. संतकवी कोण्या एका गावाचे नाही घराण्याचेही नाहीत.
सेना ‘न्हावी’, सावता ‘माळी’, नामा ‘शिंपी’, गोरा ‘कुंभार’, नरहरी ‘सोनार’ कान्होपागा ‘वारांगना’, एकनाथ ‘ब्राह्मण’, तर चोखा ‘महार’ अशी एकात्मतेती शिकवण. विठ्ठलाच्या गावा जावे, विठ्ठलरूप व्हावे हेच सत्य आहे. विठ्ठलाला माऊली मानणाऱ्या या संताच्या मनात विठ्ठल ही प्रेम-वात्सल्याची मूर्ती आहे. सासुरवाशीण मुलगी माहेराला जाते.
प्रतिवर्षी या प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यसाठी सकल संताची मांदियाळी वैष्णवांसह पंढरपुरी जायला निघतात. जागोजाग मुक्काम करीत पायी पंढरपुरास पोचते. एका अर्थी ही संत साहित्य संमेलने होतात. चर्चा होतात. अनुभवी, अभ्यासू वारकऱ्यांची कीर्तने होतात. त्यातून टाळकऱ्यांचे सहज शिक्षण होते. वारीची ही वाट संतांनी दाखविली आणि याच मार्गावरून वाटचाल करीत जीवनालाच सदाचारी बनविले. हा मार्ग अनुभवसिद्ध आहे. एखादी सहल काढायची तर किती तयारी, विचार करावा लागतो जेवढी‍ सहलीला येणाऱ्याची संख्या जास्त तेवढा तणाव अजून वाढतो. पण वारीचे तसे नाही, वारी ठरावीक तिथीला निघते आषाढीला पोचते. कोणाला निमंत्रण नाही. वर्गणी नाही. सक्ती नाही. पण विणेकर्यांच्या भोवती दिडींचा आराखडा. रांगा किती, महिला किती, महिला वारकरी कुठे, सगळे काही ठरवल्यासारखे. गोपालकाल्यात सर्वांच्या शिदोऱ्या एक करतात आणि नंतर वाटून घेतात, नकळत एकमेकांची प्रांपचिक दु:खेही वाटून घेतात.
पताकांचे भर मिळाले अपार,
होतो जयजयकार भीमा तीरी !!
हरिनाम गर्जता भय नाही चिंता,
ऐसे बोले गीता भागवत !!
खटनट यावे शुद्ध होऊनी जावे,
दवंडी पिटी भावे चोखा मेळा !!

Sunday, 4 June 2017

संत तुकोबांचे एकनिष्ठ शिष्य ‘निळोबाराय’

संत तुकोबांचे एकनिष्ठ शिष्य ‘निळोबाराय’



तुमचे चरणी राहो मन, करा हे दान कृपेचे !!
नामी तुमचे रंगो वाचा, अंगी प्रेमाचा आविर्भाव !!
संत निळोबाराय हे वारकरी सांप्रदायातील थोर संत. निळोबाराय यांचा जन्म श्री तीर्थक्षेत्र पिंपळनेर (अहमदनगर जिल्हा, ता. पारनेर) इ.स. १६३५ मध्ये झाला. वडील मुकुंदबाबा व आई राधाबाई. घरातील सात-आठ पिढ्यांनी जमवलेली ३००-४०० ग्रंथांची ग्रंथसंपदा मिळाली आणि निळोबांचे वाचन सुरू झाले. त्यांचे वाचन अगदी स्पष्ट. आवाज खणखणीत त्यामुळे आजूबाजूच्या आया-बाया येऊन बसू लागल्या. नंतर गर्दी वाढू लागली. काही पुरुषही येऊ लागले. निळोबा मधून मधून छान निरुपण करत. भावार्थ रामायण झालं, नाथभागवत झालं. पाठोपाठ ज्ञानेश्वरी झाली. मग हे तीनही ग्रंथ त्यांनी स्वहस्ताक्षरात दीड-दोन वर्षांत नकलून काढले.
बघता बघता निळाला सोळावे लागले. मधल्या ४-५ वर्षांच्या काळात त्याने शेषाचार्यांकडून संस्कृत शिकून घेतले होते. पंतकाकांकडून कुलकर्णीचे कामकाज शिकून घेतले. शिवाय ज्ञानदेव, नामदेव व एकनाथ महाराज यांचे अभंग, गौळणी, भारूडं हे सारं नकलून घेतलं.
आता राधाबाईंना (निळोबांच्या आईला) सुनमुख पहायची घाई झाली. पंतांकडे तिने टुमणं लावलं. वाळकीच्या अप्पासाहेब जहागीरदारांची मुलगी मैना ही सून म्हणून मकाशिर्यांच्या घरात आली. आणि वर्षभरातच भगवान रामलिंगाच्या आज्ञेने पंतांचं निर्वाण झालं. निळूचे पितृछत्र हरपले आणि दोनच महिन्यात मातोश्रींनी जीवनयात्रा संपवली.
निळोबास आता पंढरीची ओढ लागली होती. ज्ञानोबा माऊली, नामदेव, चोखोबा, गोरोबा, जनाई, नाथमहाराज, तुकाराम महाराज अशा थोर थोर संतांनी वर्णिलेलं ते विटेवरचे सावळे परब्रह्म डोळे भरून पहावे, अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. काही आठवड्यांतच मैनेस दिवस गेले आणि एका पौषात सुमुहूर्तावर सगळे पंढरीस निघाले. जशी पंढरी जवळ येऊ लागली तशी निळोबांची वृत्ती प्रफुल्लित झाली. दुपार टळत आली होती. पंढरीच्या वेशीस पोचले आणि निळोबाने तडक गाडीतून उडी मारली. वेशीसमोर दंडवत घातले. त्यांचे डोळे प्रेमाश्रुंनी भरले होते.
निळोबाचा एक आठवडाभर मुक्काम पंढरीस होता. रोज सायंकाळी निळोबा राऊळी कीर्तन करत असे. ते रसाळ कीर्तन ऐकण्यास रोज गर्दी वाढू लागली. भाविक त्यांना संत निळोबाराय म्हणू लागले. लोकांची उपाधी वाढू लागली तसं निळोबांनी मुक्काम हलवण्याची तयारी केली. पंढरीच्या त्या मुक्कामात श्री पांडुरंग व त्याची पुण्यनगरी यावर निळोबांनी सुमारे दीडशे अभंग रचले. श्री क्षेत्र आळंदीसही तोच प्रकार. श्री ज्ञानदेवांच्या समाधीवर मस्तक टेकवता निळोबांस गहिवरून आले. आणि त्यांच्या मुखी ज्ञानेशाची स्तुती उमटली. संत निळोबाराय यांनी श्री तीर्थक्षेत्र पिंपळनेर येथे इ.स.१७५१ मध्ये ठिकाणी निळोबारायांनी समाधी घेतली.

Sunday, 21 May 2017

कीर्तन म्हणजे भगवानबाबांचेच

कीर्तन म्हणजे भगवानबाबांचेच

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती ! रखुमाईच्या पती सोयरिया !!
गोड तुझें रूप गोड तुझें नाम ! देईं मज प्रेम सर्व काळ!!


महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील थोर संत. संत भगवानबाबा यांचा जन्म २९ जुलै, इ.स. १८९६ सुपे सावरगाव घाट, पाटोदा येथे झाला. ते विठ्ठलाचे मोठे भक्त होते. जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नंतरच्या कालखंडात संतपदाला पोचलेले ते पहिले महापुरुष आहेत. त्यांना स्वतः तुकाराम महाराज यांनीच स्वप्नबोध केला होता, असे मानले जाते. तुकारामोत्तर कालखंडात वारकरी धर्माला प्रेरणा देण्याचे महान कार्य त्यांनी केले. ते संत एकनाथांच्या परंपरेतील नाथफडाचे प्रसिद्ध टाळकरी संत होते. ते भागवत धर्माचा झेंडा फडकाविणारे एक प्रबोधनकर्ते कीर्तनकार होते. त्यांच्याविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की, त्यांनी पाण्यावर तरंगून ज्ञानेश्वरीचे पारायण केले होते.
भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. ‘कीर्तन म्हणजे भगवानबाबांचेच’ असे लोक गौरवाने म्हणत. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यांच्या ऐश्वर्यशाली व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा व कार्याचा त्यांच्या काळातील समाजावर फार मोठा प्रभाव पडलेला होता व तो तेवढाच परिणामकारकपणे आजही अनुभवास येतो. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा समाज आहे. त्यांनी वार्षिक नारळी सप्ताहाची स्थापना केली. सर्वधर्मसमभाव, अंधश्रद्धानिर्मूलन, शिक्षणप्रसार, वार्षिक नारळी हरिनामसप्ताह, पंढरपूरवारी यासारखे जनकल्याणचे काम करणारे एक आदर्श समाजमार्गदर्शक, समाजसुधारक होते. भगवानगडाची संस्थापना त्यांनी केली. भगवानगड आज वारकरी धर्म चळवळीचे मोठे केंद्र बनले आहे. महाराजांनी वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी इहलोकीची यात्रा संपवून वैकुंठगमन केले. प्राणत्याग करताना त्यांनी वारकरी महावाक्याचा जयघोष केल्याचे सांगितले जाते.
विठो माउलिये हाचि वर देईं ! संचरोनि राहीं हृदयामाजी!!
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक! तुझे पायीं सुख सर्व आहे!!

Sunday, 14 May 2017

आत्मज्ञानदीप प्रज्वलीत करणारे संत : बंकटस्वामी महाराज

संत संगतीचे काय सांगू सुख !
आपणा पारिखे नाही तेथे !!
साधू थोर जाना साधू थोर जाना..!!

बंकटस्वामी महाराज हे महाराष्ट्रातील एक थोर संत. त्यांनी वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून समाज सुधारण्याचे काम केले. श्री. स्वामी महाराजांचा जन्म मराठवाडा विभागातील बीड जिल्ह्यात शके १७९९ मध्ये निनगुर गावी झाला. (बुंदेलखंडातून येथे वास्तव्यास आलेल्या राजपूत घराण्यांमध्ये महाराजांचा जन्म झाला) स्वामी महाराजांचे जन्माबाबात असे सांगण्यात येते की, स्वामी महाराज आपल्या आईच्या गर्भात १८ महिने होते. प्रसूतीसाठी व्याकूळ व चिंतातूर असणारी माता रन्नदेवी व पिताजी निहालसिंग यांनी सुखरूप व लवकर प्रसूती व्हावी म्हणून कुलदैवत श्री व्यंकटेशाची प्रार्थना केली आणि बालकाचा जन्म होताच श्री व्यंकटेशाचा प्रसाद म्हणून मुलाचे नांव व्यंकटेश ठेवले पण रजपूत घराण्यांचे परंपरेनुसार त्या नावांमध्ये सिंग हे लावून त्याला व्यंकटसिंग असे नावाने ओळखले जाऊ लागले. परंतु, याही नावाचा अपभ्रंश पुढें बंकटसिंग असा झाल्यामुळे लोक त्यांना बंकटसिंगच म्हणू लागले. महाराज गुणाबरोबरच व्यवहार कुशलता, चातुर्य, प्रसंगावधान, हुशारी, उत्तम सचोटी व सत्त्वशील वृत्ती इ. हे गुणसुद्धा त्यांचे ठिकाणी जन्मजात होते.
वारकरी पंथाची पताका उंचउंच चिरकाल फडकत रहावी म्हणून गुरुवर्य जोग महाराजांनी १९१९ साली स्वतः ११ हजार रुपये देणगी देत पवित्र इंद्रायणीच्या जलतुषाराने पावन व श्री ज्ञानचक्रवर्ती ज्ञानदेवांच्या समाधीमुळे अलंकृत झालेल्या आळंदी क्षेत्रांमध्ये वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. तेथे श्री मामासाहेब दांडेकर, श्री लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, श्री मारोतीबुवा गुरव व श्री. बं. स्वामी महाराज हे चार आधारस्तंभ नेमून दिले. शके १८४१ इ.स.१९२० साली गु. जोग महाराज ब्रह्मस्वरूपी लीन झाले. स्वामी प्रत्येक अधिकमासांत पंढरपुर, पैठण, नासिक इ. एकेका क्षेत्रांत महिनाभर मोठा सप्ताह करून अन्नदान करीत. दररोज साधारण दहा हजार बाहेरगावांचे लोक टाळकरी व त्या गावांतील रोज एकेक गल्ली जेवणास रहात असे. शेवटीचे दिवशी संपूर्ण मुक्ताद्वार राही. त्यामुळे भरपूर अन्नदान होत असे. सर्व दिवसांच्या पंक्ती बहुतेक नेमलेल्याच असत. श्री. स्वामींनी आपले जीवन केवळ ईश्‍वरसेवेसाठी समर्पण केले होते. 
धर्मप्रचार आणि संप्रदाय प्रचारार्थ स्वामी महाराज गावोगाव उन्हातान्हात पायी फिरत, पण बरोबर घोडे-गाडी इ. अनेक साधने असूनही त्यांत ते बसत नसत. रात्री कीर्तनासाठी तीन-तीन तास उभे राहत. आषाढीचे वेळी काही दिवस देहूवरून श्री. तुकाराम महाराजांची पालखी सोहळ्याबरोबर व नंतर दौंडकडून पंढरपूरला श्री स्वामी दिंडी आणीत व कार्तिक वारीला निनगुरहून कार्तिक शु.१ ते शुद्ध दशमीपर्यंत १५ दिवस पायी दिंडी आणीत. याही वेळी शेकडो गोड्या-घोडे इ. साधने बरोबर असूनही त्यात न बसता पायी भजन म्हणून चालत असत. महाराजांनी अखंड वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार केला. शेवटी इ.स. १९४४ ला या भगवद भक्ताचे महानिर्वाण झाले.
ईश्‍वराने प्रदान केलेल्या आपल्या ६७ वर्षांच्या आयुष्याचे स्वामी महाराजांनी अक्षरशः सोने केले, विठोबाचे दास होऊन हरिभजनाने जग धवळून काढले. तर कीर्तन प्रवचन सेवेने ठायी ठायी आत्मज्ञानीदीप प्रज्वलीत केले. दिंडी सप्तहादी उपक्रमाद्वारे वैष्णांची मांदियाळी मेळविली. 

Monday, 8 May 2017

सगुण हा घाणा घेऊनि बैसलो : संत जगनाडे महाराज

सगुण हा घाणा घेऊनि बैसलो : संत जगनाडे महाराज

सगुण हा घाणा घेऊनि बैसलो, तेली जन्मा आलो घाणा घ्याया।।
नाही तर तुमची आमची एक जात, कमी नाही त्यात अणु रेणु।।
संतु म्हणे जाती दोनच त्या आहे, स्री आणि पुरुष शोधुनिया पाहे।।
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म आठ डिसेंबर १६२४ ला पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मावळ या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठल भक्त होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर धार्मिक संस्कार झाले व धार्मिक बाजूकडे त्यांना आवड निर्माण झाली. त्यांनी आपला पारंपरिक व्यवसाय म्हणजे तेल गाळण्यास सुरवात केली. त्या काळी बाल विवाहाची परंपरा असल्यामुळे त्यांचा वयाच्या १२ व्या वर्षीच यमुनाबाईंशी विवाह झाला व ते संसाराच्या बेडीत अडकले. त्यांचे लक्ष फक्त कुटुंबावरच लागले होते. त्या काळी संतांचे समाजाला कीर्तने अभंगांच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा संत तुकाराम महाराज संताजींच्या गावी मावळला कीर्तनासाठी आले होते. तिथे संत तुकारामांचा प्रभाव संताजींवर खूप मोठ्या प्रमाणात पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला. 
तेव्हा संत तुकारामांनी संताजींना समजावून सांगितले, की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. तेव्हापासून संत संताजी जगनाडे महाराज हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यातील प्रमुख टाळकरी म्हणून ओळखले जाऊ लागले. संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांची अभंगे लिहिण्यास सुरवात केली.
 संत तुकाराम महाराज यांचा जसा लोकांवर प्रभाव वाढत जात होता. संत तुकाराम महाराज हे संत संताजी जगनाडे महाराजांच्या अगोदरच वैकुंठाला गेले. पण ज्यावेळी संत संताजी महाराजांचा अंत समय आला त्यावेळी कितीही प्रयत्न केले तरी काही संताजींचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते. त्यांचा चेहरा हा राहत होता तेव्हां वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले होते अशी अख्यायिका आहे. तीन मुठी माती टाकल्यानंतर संताजींचा पूर्ण देह झाकला गेला. तो काळ होता इ.स. १६८८.
देह क्षेत्र घाणा ऐका त्याच्या खुणा, गुदस्थान जाणा उखळ ते ।।
 स्वाधिष्टानावरी मन पुरचक्र, विदुं दंत चक्र आनु हात ।। 
संतु म्हणे माझा घाणा हो देहांत, चालवि आपोआप पांडुरगं ।।

Saturday, 29 April 2017

अामुचीये कुळी पंढरीचा नेम ः संत भानुदास

जपता नाम विठ्ठलाचे, भय नाही हो काळाचे !
नाममंत्र त्रिअक्षर, करी सदा तो उच्चार!
विठ्ठलनामे सुख, आनंद भानुदासा परमानंद !

महाराष्ट्रातील पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन आपण घेतो त्याचे सर्व श्रेय जाते ते नाथांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांना.
भानुदास महाराज यांचा जन्म इ.स. १४४८ साली एका ब्राह्मण कुळामध्ये झाला. बालपणीच सूर्यनारायणाची उपासना करून त्यांनी त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले होते. प्रपंच चालविण्यासाठी त्यांनी कपड्याचा व्यापार सुरू केला. व्यापाराच्या व्यापात असूनही त्यांनी पंढरीची वारी कधीही चुकविली नाही. भानुदास हे विठ्ठल भक्त होते. त्यांची कीर्ती पसरली ते एका ऐतिहासिक घटनेमुळे. विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय एकदा पंढरीस आला. श्रीविठ्ठलास आपल्या राज्यात नेवून प्रतिष्ठित करावे, असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने तसे केले. आषाढी वारी जवळ आल्यानंतर पंढरीत वारकरी श्रीविठ्ठल दर्शनार्थ जमू लागले. परंतु, ज्याच्या दर्शनासाठी आपण येथवर आलो आहोत तोच जागेवर नसल्याचे पाहून वारकरी आलाप करू लागले. त्यावेळी भानुदासांनी सर्वांना आश्‍वासन दिले की, मी विठ्ठलास परत येथे आणीन. काही दिवसांनी ते मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठलासमोर येऊन उभे राहिले.
विठ्ठलाने आपल्या गळ्यातील तुळशीच्या हारासह नवरत्‍नांचा हार भानुदासांच्या गळ्यात घालला असे बोलले जाते. भानुदास तेथून बाहेर पडले. पहाटे काकड आरतीच्यावेळी जेव्हा पुजारी तेथे आले असता त्यांच्या लक्षात आले की, देवाच्या गळ्यात नवरत्‍नांचा हार नाही. राजापर्यंत बातमी पोचली. जो कोणी चोर असेल त्यास परस्पर सुळावर चढविण्याचे फर्मान राजाने सोडले. सैनिक सर्वत्र पसरले. पहाटेच्या वेळी तुंगभद्रा नदीच्या किनारी भानुदास संध्या करीत असताना एका सैनिकास त्यांच्या गळ्यात नवरत्‍नांचा हार दिसला. हाच चोर असावा असं गृहीत धरून सैनिकाने भानुदासांस बंदी बनविले. त्यांना सुळावर चढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी भानुदासांच्या मुखातून अभंग प्रकटला, जै आकाश वर पडो पाहे! ब्रह्मगोळ भंगा जाये ! वडवानळं त्रिभूवन खाये ! तरी तुझीच वाट पाहे गां विठोबा ! ज्या सुळावर त्यांना चढविण्यात येणार त्या सुळास पालवी फुटली. ही बातमी राजापर्यंत पोचली. राजाचा थरकांप उडाला, ज्याला आपण चोर समजलो तो चोर नसून महान भगवद्‍भक्‍त असावा हे त्याच्या लक्षात आले. माझ्या भक्‍ताचा छळ झाल्यामुळे मी तुझ्याकडे राहणार नाही, असा इशारा विठ्ठलाने दिला. भानुदास विठ्ठलाला घेऊन पंढरीस निघाले. पंढरीजवळ आल्यानंतर आनंदित झालेल्या वारकऱ्यांनी श्रीविठ्ठलाची रथावरून मिरवणूक काढली तो दिवस होता कार्तिक शुद्ध एकादशी इ.स. १५०६ चा. (आजही कार्तिकी एकादशीस रथोत्सव होतो तो या दिवसाचे स्मरण म्हणून.) भानुदासांनी आपली इहलोकीची यात्रा संपविली.
श्रीविठ्ठल दर्शनास जाताना गरुड मंडपामध्ये उजव्या हातास दरवाज्याजवळ ज्या पहिल्या पादुका आहेत, ती म्हणजे श्रीभानुदास महाराजांची समाधी होय. आजही त्यांच्या समाधीदिनाचा उत्सव वारकऱ्यांमध्ये साजरा करण्यात येतो. या दिवशी त्यांच्या वंशजांकडून परंपरेने प्रतिवर्षी समाधीचे पूजन, नैवेद्य कीर्तनादी करण्यात येते.
संत श्री भानुदासांच्या भक्‍तितून अंशत:उतराई होण्यासाठी विठ्ठलाने त्यांच्या वंशात जन्म घेतला तो संत एकनाथ महाराजांच्या रुपात.
भानुदासाचे कुळी महाविष्णुचा अवतार,
क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर !

प्रांताप्रांताच्या सीमा ओलांडणारा संत : सेना महाराज

जातां पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि!!
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनीं, पाहिली शोधोनि अवघी तीर्थे!!
ऐसा नामघोष पताकांचे भार, ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठें!!


श्रीविठ्ठल आणि वारकरी सांप्रदायाने फक्त जातीपातींच्या सीमा मोडल्या नाहीत तर प्रांताप्रांताच्याही सीमा ओलांडल्या. संत सेना महाराज त्याचेच एक उदाहरण. मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा. घरात बादशाहाची हजामत करण्याचा मान. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजेत रमलेले. अशी एक गोष्ट सांगतात की, एकदा बादशाहाने त्यांना हजामतीला बोलावले. तर सेना महाराज पूजेत रममाण झालेले. तेव्हा बादशाहा चिडला आणि त्याने सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले.
तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशाहाची हजामत केली आणि सेना महाराजांना वाचविले. देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या कथेतील भावार्थ समजून घ्यायला हवा. सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते.
सेना महाराजांचे वडील देविदास बांधवगडच्या राजाकडे नाभिकाचे काम करीत असत. आई प्रेमकुंवरबाई सात्विक स्वभावाची गृहिणी होती. वडील देविदासानंतर परंपरेनुसार राजाकडील नाभिकाचे काम सेना महाराजांकडे आले. सेना महाराजांचा लहानपणापासूनच भक्तीमार्गाकडे ओढा होता. त्यांच्या हिंदी मातृभाषेतून ते भक्तीरचना सुध्दा करु लागले. कालांतराने महाराष्ट्र्रातील त्या काळच्या संतांची माहिती सेना महाराजांना मिळाली. त्या संतांच्या व पंढरपूरच्या विठ्ठल भेटीसाठी ते आतूर झाले. तिर्थयात्रा करित करीत ते इकडे आले संत निवृत्तीवरनाथ, संत ज्ञानेश्र्वर, संत नामदेव व इतर त्यांचे समकालीन संत होते. या महान संतांच्या सान्निध्यात येऊन ते महाराष्ट्र्राच्या पावनभूमीत रममाण झाले. त्यांनी मराठी भाषा आत्मसात करुन मराठी भाषेवर इतके प्रभूत्व मिळविले की, मराठी भाषेत त्यांनी अनेक उत्कृष्ट अभंगांची निर्मिती केली. भागवंत संप्रदायातील वारकरी भक्तीरसात त्यांनी स्वत:ला झोकून दिले.
एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्र्रातील भक्तांना जरासुध्दा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्र्वर, तुकारामाइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरुन सिध्द होते.
नामदेव, तुकाराम, सेना न्हावी, गोरा कुंभार, चोखामेळा अशा अनेक संतांनी त्यांच्या अभंगवाणीतून समाज प्रबोधन केले. संसारात राहून सुध्दा ईश्र्वर भक्ती करुन परमार्थ साधला जाऊ शकतो हे लोकांना सांगितले. कर्मठ उच्चवर्णियांनी निर्माण केलेली उच्चनीच, जातीभेद ही परंपरा मोडीत काढण्यासाठी उपदेश केला. स्वत:ही तसे वागले. त्यांनी निर्माण केलेले काव्य, अभंग, यांचाच जनतेवर इतका प्रचंड प्रभाव पडला की इतर काही चमत्कारांनी त्यांचे मोठेपण सिध्द करण्याची काहीच गरज नसावी.
नंतर महाराष्ट्र्रातील वास्तव्य संपवून सेना महाराज पुन्हा त्यांच्या जन्मभूमीस तीर्थाटन करीत निघून गेले. त्यांच्या हिंदी भक्तीरचना उत्तरेकडील सर्व हिंदी प्रदेशातून म्हटल्या जातात. महाराजांनी काही रचना पंजाबी भाषेत सुध्दा केल्या आहेत. 'जाता पंढरीसी सूख वाटे जीवा' असे म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लिन झाला. पंढरी ही त्यांच्या जीवनाचा ध्यास बनली. या महान भगद् भक्ताची श्रावण वद्य द्वादशीला पुण्यतिथी साजरी केली जाते.

आम्ही वारीक वारीक, करू हजामत बारीक !!
विवेक दर्पण आयना दाऊ, वैराग्य चिमटा हालऊ !!
चौवर्णा देऊनी हात, सेना राहिला निवांत !!  

Monday, 17 April 2017

जनसेवा हीच ईश्वरसेवा संत तुकडोजी महाराज

संत देहाने भिन्न असती, परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती!
साधने जरी नाना दिसती,  तरी सिद्धान्तमति सारखी!
तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे आहे. त्यांचा जन्म एप्रिल २७, १९०९ मध्ये यावली (जि. अमरावती) येथे झाला. त्यांचे आई मंजुळाबाई व वडील बंडोजी व गुरू आडकोजी महाराज होते. अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की, राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सूचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. ‘आते है नाथ हमारे’ हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.
आपली वाणी आणि लेखणी, शक्ती आणि भक्ती यांचे सर्व सामर्थ्य एकवटून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामाजिक जागृतीचे आणि प्रगतीचे प्रयत्न सातत्याने केले. आपल्या देशातील झोपी गेलेली खेडी जागी व्हावीत, अज्ञान, लोकभ्रम आणि सामाजिक निष्क्रियता यामुळे ग्रामीण जीवनाची झालेली दुर्दशा नाहीशी व्हावी, तिथल्या समाजाची सुधारणा व्हावी व सुखी जीवनाच्या दृष्टीने वाटचाल व्हावी, ग्रामस्थांच्या आयुष्यात चैतन्य निर्माण व्हावे यासाठी त्यांनी कार्य केले. सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने भाग्यशाली असलेला हा देश शिक्षण, आरोग्य आणि धनधान्य याही बाबतीत तितकाच वैभवशाली का नाही, या विचाराने संत तुकडोजी महाराजांचे मन सदैव तळमळत असे. सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली, अनुभव सागर भजनावली हे त्यांचे साहित्य. अंधश्रद्धेवर त्यांनी त्यांच्या लेखनातून, कीर्तनातून प्रहार केले. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी आपल्या खंजिरी भजनाच्या माध्यमातून आपल्या विचारसरणीचा पुरस्कार केला. अशा या महान राष्ट्रसंताने ११ ऑक्टोबर, १९६८ ला देह ठेवला. त्यांचे विचार आजही समाजात जिवंत आहेत.
या झोपडीत माझ्या राजास जी महाली, 
सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, 
या झोपडीत माझ्या !!
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या!!




Monday, 10 April 2017

गणेशभक्त संत मोरया गोसावी

गणेशभक्त संत मोरया गोसावी

चिंतामणी देवा गणपतीसी आणा, करवावे भोजना दुजे पात्री !!
देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी, अभिमानाभीतरी नागवलो !! 


मोरया गोसावी हे सतराव्या शतकातील संत. श्री गणेशाचे ते मोठे भक्त होते. मोरया गोसावी हे शाहू महाराज व पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे समकालीन होते. कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील बसव तालुक्यातील शाली हे त्यांच्या आई-वडिलांचे मूळ गाव. मोरया यांचे आई- वडील वामनभट शाळिग्राम आणि पार्वतीबाई हे वैदिक कुटुंबातील. ते दोघे पुण्यातील मोरगावला येऊन स्थिर झाले. तेथे कऱ्हा नदीचे खळाळणारे पाणी, मोरयाची भव्य मूर्ती याने भुरळ घातली. त्या परिसराबद्दल काही अद्‍भुत कथा वामनभटांच्या एेकल्या होत्या. ब्रह्मदेवाने मोरगावला तपश्चर्या केली, त्याच्या कललेल्या कमंडलुतून कऱ्हा नदी उगम पावली या कथांमुळे वामनभट प्रभावित झाले होते. त्यांनीही अनुष्ठान मांडले.

 मोरयाने स्वप्नात येऊन सांगितले, की ‘तुझ्या नशिबात पूत्र नाही.’ त्यामुळे वामनभट खट्टू झाले; पण त्यांनी धीर सोडला नाही. त्यांनी पुन्हा तपश्चर्या सुरू केली. शेवटी, पार्वतीबाईंचा पाळणा हलला. त्यांनी बाळाचे नाव मोरया हेच ठेवले. मोरया वाढू लागला. त्याची मुंज झाली. त्याचे वेदाध्ययन झाले. त्याच्यात तपश्चर्येची ऊर्मी जागी झाली. त्यांना नयन भारती गोसावी गुरू भेटले. मोरया त्यांच्या प्रेरणेने थेऊरला आले. त्याची तपश्चर्या मुळा-मुठेच्या काठी चिंतामणीजवळ सुरू झाली. 
मोरयाच्या बेचाळीस दिवसांच्या तपश्चर्येनंतर चिंतामणीने मोरयाला दर्शन दिले. मोरयांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी चिंचवड सोडावे, चतुर्थीपर्यंत मोरगावला परत यावे, मोरयाची पूजाअर्चा करावी, पंचमीचे पारणे करून परतावे असा त्यांचा नियम होता. मोरया गोसावींच्या मोरगाव वारीत कधी खंड पडला नाही. मोरया गोसावींना १६१६ पासूनच जमिनी इनाम म्हणून मिळू लागल्या होत्या. त्यांना आदिलशहा, निजामशहा, शहाजीराजे, शिवाजीराजे यांच्याकडून मोरगाव, कुंभार वळण, चिंचवड, चिंचोली या आणि इतर अनेक ठिकाणच्या जमिनी मिळाल्या. संप्रदाय वाढला, अन्नछत्र-सदावर्त, उत्सव-यात्रा, पूजाअर्चा यांचा पसारा वाढला. मोरया गोसावी वयोमानाप्रमाणे थकले.
 मार्गशीर्ष वद्य षष्ठी २५ जानेवारी १६५७ या दिवशी सकाळीच गुंफेत जाऊन बसले. मोरया गोसावींनी संजीवन समाधी घेतली. त्यावर त्यांचे पूत्र थोरल्या चिंतामणी महाराजांनी मोठी शिळा ठेवली आणि त्यावर सिद्धी-ऋद्धीसह मोरयाची मूर्ती बसवली. चिंतामणी महाराजांनी १६५८-५९ मध्ये त्यावर देऊळ बांधले. समाधीच्या प्रवेशद्वारावर कोथळ्याहून आणलेली अर्जुनेश्वर शंकराची मोठी पिंड बसवली.

वाड वेळ झाला शिळे झाले अन्न, 
तटस्थ ब्राह्मण बैसलेती!! 
तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, 

आणिन त्वरित मोरयास!!

Sunday, 2 April 2017

श्रेष्ठ कृष्णभक्त संत मीराबाई

श्रेष्ठ कृष्णभक्त संत मीराबाई
पग घुंघरू बांध 
मीरा नाची, रे !
मैं तो मेरे नारायण की, 
आपहि होगइ दासी, रे !
लोग कहें मीरा भई बावरी, न्‍यात कहैं कुल नासी, रे !!
संत मीरा या मध्ययुगीन भारतातील एक श्रेष्ठ कृष्णभक्त संत कवयित्री. त्याचा अर्थ ‘श्रेष्ठ’, ‘श्रीमंत’ असा आहे. त्यांचा जन्म राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका राजपूत कुटुंबात झाला. राव दुदाजी हे मीराबाईंचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दुदाजी मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजी यांचे पुत्र.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दुदाजी यांच्या छत्राखाली मीराचे बालपण गेले. एका आख्यायिकेनुसार, लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला विचारले, की माझा पती कोण होणार? आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि हा तुझा पती असे सांगितले. तेव्हापासून मीरा मूर्तीप्रेमी बनली. तिने या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते. लहान वयातच चित्तोडच्या राणा संगांचा पूत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी लग्न झाले आहे, असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला.१५२७ मध्ये एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगूर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णन करणारी तिची भजने याची साक्ष देतात. सुरवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खासगी बाब होती; पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हटले जाते. ‘विष का प्याला राणाजी भेज्या, पीवत मीरा हाँसी रे’ ! ‘मीरा के प्रभू गिरीधर नागर’ ही तिच्या अनेक पदांत येणारी नाममुद्रा होय. गुजरातमधील द्वारका इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविली. त्यानंतर द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली. नाभादास, प्रियादास, ध्रुवदास, मलुकदास, हरिराम व्यास इ. संतचरित्रकारांनी व संतांनी मीराबाईंबद्दल अत्यंत आदराने गौरवोद्‌गार काढले आहेत. मध्ययुगीन राजस्थानी, गुजराती व हिंदी साहित्यात संत कवयित्री म्हणून मीरेचे स्थान अनन्यसाधारण आहे.
पायो जी मैने

राम रतन धन पायो!!

Saturday, 18 March 2017

मानवता हीच मानवाची जात : संत रोहिदासा


मानवता हीच मानवाची जात : संत रोहिदासा

ऐसा चाहो राज मे, जहाँ मिले सबन को अन्न !
छोट बडो सभ सम बसे, रविदास रहे प्रसन्न !!
संत रोहिदास यांचा जन्म उत्तर प्रदेशातील काशी (वाराणशी) जवळील मांडूर या गावचा. चर्मकार समाजातील रघुराम व कर्मादेवी या दांम्पत्याच्या घरी १३७३ मध्ये माघ पौर्णिमेस त्यांचा जन्म झाला. या कालखंडात भारतीय समाजव्यवस्थेत जातीयतेने थैमान घातले होतं, प्रचंड भेदभाव होते. अशा सामजिक व्यवस्थेविरुद्ध संत रोहिदासांनी अध्यात्मिक वाणीने धार्मिक सहिष्णुता, सामाजिकता या उद्देशाने जनतेसाठी लढा उभारला. मानवता हाच खरा धर्म त्यांनी समाजासमोर मांडला. म्हणून ते मानवतेचे आद्य पुरस्कर्ते होते. संत रोहिदासांचे विचार आजही भारतीय समाजाच्या विकासासाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहेत.
संत रोहिदास लहानपणापासून भक्तीवेडे, त्यामुळे भजन, पूजन तसेच साधुसंतांच्या सेवेत त्यांचा वेळ जात असे. रोहिदासांचा कालखंड म्हणजे प्रचंड समाजिक विषमता, अन्याय, अत्याचार आणि शोषणाचा होता. त्यांनी अध्यात्माव्दारे भारतीय समाज जागृतीचे काम असीम निष्ठेने, अविरत परीश्रम आणि सदाचाराच्या बळावर केले. अध्यात्मिक ज्ञान, सामाजिक विचार, जनसमान्यांपर्यंत पोहचवतानाच त्यांनी समाजाला एकत्रीत आणून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
संत रोहिदासांचे भारतीय समाजव्यवस्थेतील वर्णव्यवस्था व जातीयतेबद्दलचे विचार परखड आणि स्पष्ट होते. ते म्हणतात, भारतीय सामाजिक व्यवस्था केळाच्या झाडासारखी आहे. ज्याप्रमाणे केळाच्या झाडामध्ये पानानंतर पान आणि त्यानंतर पान याप्रकारे शेवटपर्यंत पानेच मिळतात, तशीच स्थिती या समाजव्यवस्थेची आहे. ज्यामध्ये जाती नंतर जात, आणि पुन्हा जात, शेवटपर्यंत जातच दिसते. त्या समाजव्यवस्थेत जातीयतेमुळे बहुसंख्य लोक दु:खी, पीडीत होते. त्या विषयी ते म्हणतात, की सर्व लोक जातीव्यवस्थेच्या चक्रव्यूहात फसलेले आहेत. या जातीच्या रोगाने मानवतेला खाऊन टाकलेले आहे.
संत रोहिदासांचा एकच देव होता. तो म्हणजे निराकार निर्गुण मानवधर्म. मानवता हीच मानवाची जात आहे. या विचाराचे ते पुरस्कर्ते होते. संत रोहिदासांनी संपूर्ण भारतात भ्रमण करून जातीभेद, उच्चनीच भेदभाव, सामाजिक विषमता तसेच वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध जणू समाजिक संघर्षांचा पाया रचला. त्यांनी समाजिक समता, धार्मिक एकता व मानवतेचा पुरस्कार केला. गुरू रोहिदासांनी समाजाला मुक्तीचा संदेश दिला. गुलामगिरीच्या विरोधात विद्रोह करण्याचा संदेश दिला. दुसऱ्यावर अवलंबून राहणे पाप आहे हे पटवून दिले. रोहिदासांनी ६०० वर्षांपूर्वीच अशा राज्याची कल्पना केली होती की, जेथे सर्वाना अन्न मिळेल, सर्व समान राहतील, कोणी उच्चनीच राहणार नाही, ते म्हणतात की,
ऐसा चाहो राज मे, जहाँ मिले सबन को अन्न ।
छोट बडो सभ सम बसे, रविदास रहे प्रसन्न ।।
त्यांना सामाजिक समता हवी होती. ते अशा कल्याणकारी राज्याचे उपासक होते, जेथे सर्वाना न्याय, समता, अन्न, वस्त्र, निवारा, मिळेल व जातपात विरहित सामाजिक समता असेल त्यांच्या अध्यात्मिक ज्ञानामुळे भारतभर त्यांचे शिष्यगण तयार झाले. चितोड राज घराण्याची मीराबाई राणी झाली, पीपाजी महाराज व इतर त्यांचे असंख्य शिष्य बनले. संत कबीर आणि गुरू नानक हे रोहिदासांचे समकालीन होते. कबीरांनी गुरू रोहिदासांना मोठे बंधू मानले होते, तर ‘गुरू ग्रंथ साहिबा’ या शिखांच्या धर्मग्रंथात रोहिदासांनी ४० पदे आहेत. संत रोहिदासांनी भारतीय दलित-बहुजन समाजाला संघटीत करण्यासाठी सतत प्रयत्न केले. माझ्या सज्जनांनो, संघटीत व्हा, ज्याप्रमाणे मधमाशा एकत्रित राहतात त्याप्रमाणे संघटीत व्हा, असा उपदेश त्यांनी केला.
संत मीरा चितोड राजघराण्याची राणी होती. परंतु, संत रोहिदासांच्या आध्यात्मिक ज्ञानाने प्रभावित होऊन तिने शिष्यत्व पत्करले होते. संत रोहिदासांना चितोड येथे येण्याचे आमंत्रण दिले होते. संत रोहिदासांचे संपूर्ण जीवन संघर्षमय होते. स्पृश्य-अस्पृश्यतेमुळे ब्राह्मण-पंडितांशी त्यांना वाद विवाद करावे लागले.
संत रोहिदासांचे मानवी मूल्य जपणारे मानवतावादी विचार आजही योग्य व आदर्शवत असून समाजाला प्रेरणा देणारे आहेत. आजही भारतीय विषमतावादी समाज व्यवस्थेला बदलून टाकण्यासाठी पुन्हा संत रोहिदासांच्या मानवतावादी विचारांची पेरणी समाजाच्या सर्व घटकांपर्यंत होणे आवश्यक आहे. भारतीय समाज एकसंघ, वर्गविरहीत करण्यासाठी आध्यात्मिक आणि धार्मिक सहिष्णुतेतून समता व मानवता हाच मानवाचा धर्म या संत रोहिदासांच्या विचारांची मूल्ये भारतीय समाजव्यवस्था सुदृढ करण्यासाठी पोषक ठरणार आहेत. संत रोहिदासांच्या आध्यात्मिक, सामाजिक व मानवतावादी विचारांची दिव्यज्योत महाराष्ट्रातील चर्मकार समाजाने एक दिलाने तेवत ठेवली आहे.  माघ पौर्णिमेला संत रोहिदास जयंती साजरी केली जाते.
--------

Saturday, 11 March 2017

माणसात देव शोधणारा संत 'गाडगेबाब'




देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी !! देव चोरून नेईल, अशी कोणाची पुण्याई !!
 देव अंतरात नांदे, दे दही दिशा कोंडे !! देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी!

महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस असे म्हटले जाते. तर संत गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली. महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे करण्यात आले आहे. गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर. त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता. 

विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल मृत्यू वारले. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. १८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे सर्व जनांनी एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी गावकऱ्यांना शिकविला. १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत असत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्‍न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला आहे.
देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत. गाडगे बाबांनी अनेक धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाचा प्रसार करणाऱ्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषानेअमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या काठावर २० डिंसेंबर १९५६ आपला देहा ठेवला.

देव शोधोनिया पाही, देव सर्वांभूता ठाई !!
 देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना गावे !!

Saturday, 4 March 2017

प्रतिकाराचे सजीव रूप म्हणजे संत मुक्ताई


शुद्ध ज्याचा भाव झाला ! दुरी नाही देव त्याला !!
अवघी साधन हातवटी ! मोले मिळत नाही हाटी !!
संत मुक्ताबाई ह्या संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण म्हणून सर्वांना परिचित आहेत. यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील आळंदी देवाची येथे इ.स.१२७९ मध्ये झाला. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे त्यांचे थोरले भाऊ. परंतु, संत मुक्ताबाईचे स्वतःचेही स्वतंत्र अस्तित्व होते. त्यांनी रचलेले ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. या ताटीच्या अभंगांमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वरांना उपदेश केला आहे.
योगी पावन मनाचा ! साहे अपराध जनाचा !!
विश्वरागे झाले वन्ही ! संती सुखे व्हावे पाणी !!
संत मुक्ताबाई ह्या योगी चांगदेवांच्या गुरू. आपल्या भारतीय वैदिक संस्कृतित स्त्री ही देवतास्वरुप मानली जाते. देवी स्वरुपात तिचे पूजन केले जाते. आदिमाता, दुर्गामाता, महिषासूरमर्दिनी, महाकाली, महालक्ष्मी, पार्वती, महासरस्वती, महादेवी अशी ह्या स्त्रीदेवतांची अनेक रुपे आणि अनेक नावे आहेत. स्त्री ही सृजनाची शक्ती आहे. सर्व विश्वाची जननी आहे. ती पूजनीय आणि प्रार्थनीय आहे. आपल्या प्राचीन पुराणकाळातील अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी ह्या देवतास्वरुप स्त्रिया प्रातःस्मरणीय मानल्या जातात. त्याचप्रमाणे अलिकडच्या कालखंडातील म्हणजे सतराव्या शतकापर्यंतच्या कालखंडातील पाच संतस्वरुप स्त्रियादेखील वंदनीय आहेत.
महानुभाव पंथातील चक्रधर स्वामींची शिष्या महादाइसा, संत निवृत्तीनाथांची धाकटी बहीण मुक्ताबाई, संत नामदेवांची दासी जनाबाई, संत तुकारामांची शिष्या बहिणाबाई आणि समर्थ रामदास स्वामींची शिष्या वेणाबाई. ह्या पाच स्त्रियाही परमार्थमार्गातील संतपदाला पोहोचलेल्या तितक्याच आदरणीय आणि वंदनीय अशा स्त्रिया आहेत. ह्या स्त्री संत मालिकेत संत मुक्ताबाई ही मात्र, सर्वश्रेष्ठ आणि अग्रणी आहे. मुक्ताई ही साक्षात आदिमायेचेच प्रकट रुप होती. इ.स. १२७९ ते १२९७ ह्या कालखंडातील मुक्ताईचे एकूण आयुष्य अवघे १६-१७ वर्षांचेच होते. परंतु, एवढ्या अल्पायुषी आयुष्यातही तिने ज्ञान प्राप्त करून घेतले आणि ती संतपदावर आरुढ झाली. इतक्या लहान वयातली तिची प्रतिभा आणि परमार्थ मार्गातील तिने मिळविलेले ज्ञान आणि उच्चपद हे स्तिमित करणारे आहे.
मुक्ताबाई ही निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान या अलौकिक संतत्रिमूर्तींची तशीच अद्वितीय धाकटी बहीण. भावंडांमध्ये सर्वात लहान. ह्या भावंडांच्या आई-वडिलांनी म्हणजे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी देहत्याग केला तेव्हा मुक्ताई अवघी तीन-चार वर्षांची होती. सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेचा प्रतिकार करण्याऱ्या मुक्ताबाईचा आध्यात्मिक अनुभव थोर होता. ज्ञानेश्वरादी भावंडांमधील अस्मिता, स्वाभिमान, प्रतिकार यांचे सजीव रूप मुक्ताबाई होय. मुक्ताबाई आयुष्यातील प्रत्येक प्रसंगांना निर्भयपणे खंबीरपणे सामोरी जाते. विवेक तर मुक्ताबाईत दृढपणे विसावलेला. म्हणून जेव्हा जनसमाजाकडून प्रत्येकवेळी होणारी उपेक्षा व अपमान सहन न होऊन, ज्ञानेश्वर जेव्हा उद्विग्न स्थितीवर मात करावी म्हणून पर्णकुटीची ताटी (दार) बंद करून ध्यानस्थ बसले. त्यावेळी केवळ नऊ वर्षांची लाडीवाळ मुक्ताबाई कर्तव्यदक्ष पित्याची कठोर जबाबदारी आत्मविश्वासाने पेलून आपल्या वत्सल अभंगवाणीने ज्ञानदेवांना उद्देशून योग्याची लक्षणे कथन करते. दु:खी  अपमानित ज्ञानदेवांचे ताटीच्या अभंगात सांत्वन करते.
शब्द शस्त्रे झाली क्लेश ! संती मानवा उपदेश !!
विश्वपट ब्रम्हा दोरा ! तटी उघडा ज्ञानेश्वरा !!
ताटीच्या अभंगात मुक्ताबाईचे हळुवार, समंजस, प्रसंगावधानी, उच्च पातळीवरचे व्यक्तिमत्व साकार झाले आहे. त्यात मुक्ताबाईंनी जी संतत्वाची लक्षणे सांगितली आहेत, ती मूर्तिमंत तिच्या व्यक्तित्वात दिसून येतात.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी श्री क्षेत्र अाळंदी येथे संजिवन समाधी घेतल्यानंतर सोपानकाका सासवडला समाधिस्त झाले. नंतर नेवासा, अापेगांव, पुणतांबे, पैठण, घृणेश्वर, पहुर, जामनेर, बोदवड मार्गे हि संत मंडळी  सर्व मुक्ताईनगर (जिल्हा जळगाव) येथे अाले असता १५ दिवस मुक्ताईनगर कोथळी परिसरात वास्तव्य करुन वै. वद्य १० ला दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मुक्ताई स्व-स्वरुपकार झाल्या. त्याच मुक्ताईच्या पावन भुमीमध्ये मुक्ताई समाधी स्थळ व प्रगट्य स्थान म्हणून भव्य मंदिर अाहे.
सुख सागर अापण व्हावे ! जग बोधे निववावे !!
बोधा करू नये अंतर ! साधु नाही अापपर !!

                                                       -भागवत पेटकर

Saturday, 25 February 2017

जगाला आध्यात्मिक दीक्षा देणारे : संत तुकाराम

 विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ! भेदाभेदभ्रम अमंगळ !!
आईका जी तुम्ही भक्त भागवत ! कराल तें हित सत्य करा !! 
कोणा ही जिवाचा न घडो मत्सर ! वर्म सर्वेश्र्वरपूजनाचें !!
 तुका म्हणे एका देहाचे अवयव ! सुख दु:ख जीव भोग पावे !!

अखंड कीर्तनामुळे काया ब्रह्मभूत झालेले साक्षात्कारी सत्पुरूष, जगाच्या कल्याणासाठी स्वत:चा देह कष्टवणारे, जगाला आध्यात्मिक दीक्षा देणारे जगद्गुरू म्हणजे संत तुकाराम महाराज. संत तुकाराम वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संतांपैकी एक संतकवी. पुणे जिल्ह्यातील देहू येथे इ. स. १६०८, माघ शु. पंचमीला त्यांचा जन्म झाला. अभंग म्हटला की, तो फक्त तुकोबांचाच अभंग. एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. महाराजांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक, सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतातच. आजही तितकीच लोकप्रियता ‘अभंग’ला आहे. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा ! इतरांनी वहावा भार माथा !! असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ! शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं !! असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचा सार सांगितला. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म ! भेदाभेद-भ्रम अमंगळ !! या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली. म्हणून भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले आहे. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते आजही स्थिर आहेत. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्‌मय’ आहे.  महाराजांच्या घराण्यातील विश्र्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा. त्यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती.  पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवडी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
तुकोबारायांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात आपत्तीचे तडाखे सहन करावे लागले.  महाराज १७-१८ वर्षांचे असतांना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, मन उदास झाले, संसारात विरक्ती आली, या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. सतत विठ्ठलभक्ती आणि ती केवळ अंत: करणात व वाणीत नव्हे, तर कृतीतूनही व्यक्त करत. पंढरीची वारी आहे माझ्या घरी ! आणिक न करी तीर्थव्रत !! पांडुरंग हेच त्यांचे दैवत होते. वेद, गीता, भागवत, ज्ञानेश्र्वरी, पुराणांचा त्यांचा अभ्यास होता हे दिसून येते. अस्सल मराठमोळी भाषा हे त्यांच्या रचनांचे मुख्य वैशिष्ट्ये. वैराग्याच्या कसोटीवरचा आत्मानुभव अनंत गुणांनी त्यांच्या अभंगवाणीत प्रगट झाल्याचा दिसतो. त्यांच्या रचनांतून श्रीविठ्ठलभक्तीसह संत-गुणवर्णन, कर्मठपणा व अंधश्रद्धेवर प्रहार, दांभिक-पाखंडी-खोट्या साधूंवर टीका, विशुद्ध पारमार्थिक जीवन जगण्यासाठीची सूत्रे इत्यादी अनेक विषय समोर येतात. तुकोबांचे हे अभंग समाजातील सर्व स्तरांत इतके झिरपले आहेत की, असंख्य लोकांच्या मुखांतून त्याचे चरण सहजगत्या बाहेर पडतात. अवघ्या ४१ वर्षांच्या आयुष्यात महाराजांनी ५००० अभंगांची रचना केली. प्रत्येक क्षण त्यांनी भक्तीने व नामसंकीर्तनाने जागविला. आणि सेवटी फाल्गून वद्य द्वितीया शके १५७१ मध्ये (इ. स.१६४९)  महाराज ब्रह्मलीन झाले.
आम्ही जातो आमुच्या गावा !! आमुचा राम राम घ्यावा !!
सकळही माझी बोळवण करा !! परतोनि घरा जावे तुम्ही !!
वाढवेळ झाला उभा पांडुरंग ! वैकुंठा श्रीरंग बोलावतो !!

आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी ! सकळा सांगावी विनंती माझी !!
अंत:काळी विठो आम्हासी पावला ! कुडीसहित झाला गुप्त तुका !!

                                                                                                          --भागवत पेटकर


Saturday, 18 February 2017

विठ्ठलभक्तीचा लखलखीत आविष्कार म्हणजे संत बहिणाबाई

विठ्ठलभक्तीचा लखलखीत आविष्कार म्हणजे संत बहिणाबाई

संत कान्होपात्रेखेरीज विठ्ठलाला संपूर्ण समर्पित झालेली स्त्री संत म्हणजे संत बहिणाबाई. स्त्री संत मालिकेतील अग्रेसर मुक्ताबाई, कान्होपात्रा, जनाबाई, वेणाबाई, आक्काबाई, मीराबाई यांसह बहिणाबाईंचे स्थान मानावे लागेल. बहिणाबाईंचा जन्म वैजापूर तालुक्‍यातील देवगांव येथे शके १५५१ मध्‍ये ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांच्‍या आईचे नांव जानकी व पित्‍याचे नांव आऊजी. माता-पित्‍यानी तिचा विवाह वयाच्‍या पाचव्या वर्षी त्याच गावातील पाठक कुटूंबात लावला. संत बहिणाबाईना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. कथा, कीतने, पुराण-श्रवण आणि सत्‍पुरूषांची सेवा यात संत बहिणाबाई रमली होती. पण तिची संसारावरील आसक्‍ती कमी होवून परमार्थीक वृत्ती वाढत गेली. घरची गरीबी, शिक्षणाचा अभाव, तरीही समाधानी वृत्ती व संतवृत्तीला साजेशी पांडूरंगाची ओढ मनात होतीच. शेतात काम करित असतानाही हा भक्तिभाव अभंगाचे रूपाने तिच्या मुखातून बाहेर पडत होता. पुढे कोल्‍हापूर वास्‍तव्‍यात जयराम स्‍वामीच्‍या कथा कीर्तनाने संत बहिणाबाईच्‍या मनावर प्रभाव पडला. ती रोज तुकोबाचे अभंग म्‍हणू लागली व तुकोबाचे दर्शनाचा ध्‍यास घेतला. तिला तुकोबारायाना सदगुरू करून त्‍यांचाकडून अनुग्रह व आर्शिवाद घ्‍यावयाचा होता. म्‍हणून रात्रंदिवस तुकोबाचे अभंग म्हणत त्‍यांचे ध्‍यान करू लागली. शेवटी कार्तिक व. ५ शके १५६९ रोजी तुकोबारायानी स्‍वप्‍नात येवून गुरूपदेश दिला. बहिणाबाईचे सारे जीवन गुरूबोधामुळे बदलुन गेले. तिने आपले गुरु संत तुकाराम महाराज व त्यांचीही गुरुपरंपरा आपल्या अभंगांत वर्णन केली आहे.
संत बहिणाबाई यांनी सुमारे ४७३ अभंगांची रचना केली आहे. आणि  शके १७०० मध्ये संत बहिणाबाई समाधिस्थ झाल्या.

संत कृपा झाली इमारत फळा आली !
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया !
नामा तयाचा किन्कर तेणे विस्तारिले आवार !
जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत !
तुका झालासे कळस भजन करा सावकाश !
बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा !!

भागवत पेटकर