श्रेष्ठ कृष्णभक्त संत मीराबाई
पग घुंघरू बांध
मीरा नाची, रे !
मैं तो मेरे नारायण की,
आपहि होगइ दासी, रे !
लोग कहें मीरा भई बावरी, न्यात कहैं कुल नासी, रे !!
संत मीरा या मध्ययुगीन भारतातील एक श्रेष्ठ कृष्णभक्त संत कवयित्री. त्याचा अर्थ ‘श्रेष्ठ’, ‘श्रीमंत’ असा आहे. त्यांचा जन्म राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका राजपूत कुटुंबात झाला. राव दुदाजी हे मीराबाईंचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दुदाजी मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजी यांचे पुत्र.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दुदाजी यांच्या छत्राखाली मीराचे बालपण गेले. एका आख्यायिकेनुसार, लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला विचारले, की माझा पती कोण होणार? आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि हा तुझा पती असे सांगितले. तेव्हापासून मीरा मूर्तीप्रेमी बनली. तिने या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते. लहान वयातच चित्तोडच्या राणा संगांचा पूत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी लग्न झाले आहे, असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला.१५२७ मध्ये एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगूर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णन करणारी तिची भजने याची साक्ष देतात. सुरवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खासगी बाब होती; पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हटले जाते. ‘विष का प्याला राणाजी भेज्या, पीवत मीरा हाँसी रे’ ! ‘मीरा के प्रभू गिरीधर नागर’ ही तिच्या अनेक पदांत येणारी नाममुद्रा होय. गुजरातमधील द्वारका इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविली. त्यानंतर द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली. नाभादास, प्रियादास, ध्रुवदास, मलुकदास, हरिराम व्यास इ. संतचरित्रकारांनी व संतांनी मीराबाईंबद्दल अत्यंत आदराने गौरवोद्गार काढले आहेत. मध्ययुगीन राजस्थानी, गुजराती व हिंदी साहित्यात संत कवयित्री म्हणून मीरेचे स्थान अनन्यसाधारण आहे.
पायो जी मैने
राम रतन धन पायो!!

No comments:
Post a Comment