विठ्ठलभक्तीचा लखलखीत आविष्कार म्हणजे संत बहिणाबाई
संत कान्होपात्रेखेरीज विठ्ठलाला संपूर्ण समर्पित झालेली स्त्री संत म्हणजे संत बहिणाबाई. स्त्री संत मालिकेतील अग्रेसर मुक्ताबाई, कान्होपात्रा, जनाबाई, वेणाबाई, आक्काबाई, मीराबाई यांसह बहिणाबाईंचे स्थान मानावे लागेल. बहिणाबाईंचा जन्म वैजापूर तालुक्यातील देवगांव येथे शके १५५१ मध्ये ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नांव जानकी व पित्याचे नांव आऊजी. माता-पित्यानी तिचा विवाह वयाच्या पाचव्या वर्षी त्याच गावातील पाठक कुटूंबात लावला. संत बहिणाबाईना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. कथा, कीतने, पुराण-श्रवण आणि सत्पुरूषांची सेवा यात संत बहिणाबाई रमली होती. पण तिची संसारावरील आसक्ती कमी होवून परमार्थीक वृत्ती वाढत गेली. घरची गरीबी, शिक्षणाचा अभाव, तरीही समाधानी वृत्ती व संतवृत्तीला साजेशी पांडूरंगाची ओढ मनात होतीच. शेतात काम करित असतानाही हा भक्तिभाव अभंगाचे रूपाने तिच्या मुखातून बाहेर पडत होता. पुढे कोल्हापूर वास्तव्यात जयराम स्वामीच्या कथा कीर्तनाने संत बहिणाबाईच्या मनावर प्रभाव पडला. ती रोज तुकोबाचे अभंग म्हणू लागली व तुकोबाचे दर्शनाचा ध्यास घेतला. तिला तुकोबारायाना सदगुरू करून त्यांचाकडून अनुग्रह व आर्शिवाद घ्यावयाचा होता. म्हणून रात्रंदिवस तुकोबाचे अभंग म्हणत त्यांचे ध्यान करू लागली. शेवटी कार्तिक व. ५ शके १५६९ रोजी तुकोबारायानी स्वप्नात येवून गुरूपदेश दिला. बहिणाबाईचे सारे जीवन गुरूबोधामुळे बदलुन गेले. तिने आपले गुरु संत तुकाराम महाराज व त्यांचीही गुरुपरंपरा आपल्या अभंगांत वर्णन केली आहे.
संत बहिणाबाई यांनी सुमारे ४७३ अभंगांची रचना केली आहे. आणि शके १७०० मध्ये संत बहिणाबाई समाधिस्थ झाल्या.
संत कृपा झाली इमारत फळा आली !
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया !
नामा तयाचा किन्कर तेणे विस्तारिले आवार !
जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत !
तुका झालासे कळस भजन करा सावकाश !
बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा !!
भागवत पेटकर

No comments:
Post a Comment