वारकरी
वारक - यांचा संत नामदेवांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो , हे समजून घेणंखूप महत्त्वाचं आहे . कारण त्यातून नामदेवांचं वारकरी
परंपरेतलं स्थान स्पष्ट होत.
वारकरी संप्रदायाने जे संतपंचायतन मान्य केलेले आहे, त्यात
ज्ञानेश्वर , नामदेव , तुकाराम , एकनाथ आणि निळोबारायांचा समावेश आहे. या
संतपंचायतनामधील पाचही संतांचे स्वतंत्र
वैशिष्टय़ आहेत . ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांजे राजे , नामदेव महाराज
भक्तशिरोमणी , एकनाथमहाराज शांतिब्रह्म , तुकाराम महाराज
वैराग्यमूर्ती तर निरोळोबारायांना शिष्योत्तम म्हणून ओळखले
जातात . वारकरी नामदेव महाराजांकडे पाहताना देवाचा लडिवाळ भक्त
या दृष्टिकोणातूनच पहातात. त्यांच्या समकालीन
संतांनीही नामदेवांचे तसेच वर्णन केलेले आहे.
त्यांच्या चरित्रातूनही त्यांची देवाशी
असलेली सलगीच दिसते. भगवान पांडुरंग आणि
नामदेव महाराज यांच्यात झालेल्या संवादाचेही अनेक अभंग
आहेत . या संवादावरून नामदेव आणि देव हे वेगळे राहिलेच नव्हते हेच दिसून
येते . भगवंतांशी झालेल्या एकात्म भावातून हा लडिवाळपणा प्रकट
झाल्याचे दिसून येते .
वारकरी संप्रदायाची सामाजिक चळवळ
उभी राहण्यात ज्ञानेश्वर महाराजांच्या इतकेच नामदेव महाराजांचे
स्थानही खूप मोठे आहे. वारकरी संप्रदाय हा
ज्ञानाइतकेच भक्तीला महत्त्व देणारा आहे. किंबहुना ज्ञान
मिळवित असताना त्याला भक्तीची जोड
असलीच पाहिजे . भक्तीप्रेमाशिवाय मिळणारे ज्ञान
अभिमान निर्माण करायला कारणीभूत ठरते, असे सांगताना एकनाथ
महाराज यांनी
भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा।
अभिमाननित्य नवा तया माजी।।
भक्तीचा असा महिमा वर्णन केलेला आहे.
त्यातील शिरोमणी म्हणून नामदेव महाराजांकडे
पाहिले जाते . भगवंतांशी त्यांच्या असलेल्या लडिवाळ नात्याचा
उल्लेख त्यांच्या चरित्रात आणि अभंगातही
जागोजागी पहायला मिळतो . देवाशी
असलेली सलगी हेच आपले अंतिम ध्येय आणि
उद्दिष्ट असल्याने इतर गोष्टींची आस नामदेव
महाराजांना कधी लागली नाही .
किंबहुना त्या भक्तीच्या उन्मादातच ते सदैव
तल्लीन असायचे . विठ्ठलच आपली माता - पिता
अशी त्यांची धारणा होती . मुलाने
आपल्या आईकडे लाडाकौतूकाने हट्ट करावा , त्याप्रमाणे नामदेव
महाराजांनी अनेक हट्ट देवाकडे केले आणि देवाने ते पूर्ण केले . हा
मातृभाव पुढे अनेक वारकरी संतांनी जपला .
त्यातूनच मातृभावभक्तीची धारा
वारकरी संप्रदायात वाढीस लागली .
शक्तीपूजकांनी आपल्या देवतेला मातृरूप
मानली आहेत . मात्र ही
शक्तीची रुपे अत्यंत आक्राळ , विक्राळ दिसतात .
मग दुर्गा असेल , महिषासूरमर्दिनी असेल , नाही
तर कालिका असेल. ही रूपे भयानक आहेत .
नामदेवांनी रुजविलेल्या मातृवत्सल भक्तीमुळे
वारकरी संप्रदायात विठोबाची कधी
विठाई माऊली झाली , ते देव आणि भक्त
दोघांनाही कळले नाही . ही विठाई
माऊली जरी झाली
तरी तिचे प्रेमळ रूप मात्र बदलले नाही . उलट
भक्ताच्या भेटीने तिचा अपत्यभाव अधिकच उचंबळून येतो .
भक्तीच्या भुकेने व्याकूळ झालेल्या भक्तांना ती
प्रेम पान्हा पाजते . या आईच्या सानिध्यात प्रेमाचे भरते येते . त्या
भक्तीच्या आर्ततेत मग शक्तीपूजकांप्रमाणे
वारकरी संतही या विठाई, किठाई , कृष्णाई,
कन्हाईच्या नावाने गोंधळ घालतात . नामदेवारायांनी ` विठाई सावळे
डोळसे रंगा येई वो ` असे गोंधळाला येण्याचे आवाहन केले आहे. नामदेवांचा या
विठाईबद्दलचा जिव्हाळा इतका पराकोटीचा होता की
आपल्या जीवीचे सर्व अंतर्भाव तिलाच विश्वासाने
सांगितले आहे. आपल्या आयुष्याच्या सारा शीण , व्यथा, कथा
आणि इतर सर्व जगताना जे अनुभवाला आले ते त्यांनी इतरांपुढे
मांडण्याऐवजी केवळ विठाईकडेच मांडलेले आहे. आईपासून लेकरू
दूर झाल्यानंतर जसे व्याकूळ होते तीच अर्तता नामेदवारायांच्या
अभंगातून प्रकट होते .
डोळे शिणले पाहता वाटुली। अवस्था दाटली
हृदयामाजी।
तू माझी जननी सरश्रीये
सांगातीनी। विठ्ठले धावोनी देई
क्षेम।।
नामदेव महाराजांच्या अनेक अभंगांतून मातृभक्तीने पावन
झालेली वात्सल्य रसाची भावगंगा ओसंडून वाहताना
दिसते. ये गे विठ्ठले अनाथाच्या नाथे , तू माझी
जननी काय गे साजनी , तू माय
माऊली म्हणूनी आस केली . अशा
अनेक अभंगातून त्यांचा वत्सलभाव प्रकट झाला आहे. नामदेवारांच्या या
मातृभक्तीचा झरा पुढे वारकरी संप्रदायात वाहत
राहिला आणि अनेक संतांनी मग विठाईची करुणा
भाकली .
त्यातूनच वारकरी संप्रदायातील संत आणि देव
यांच्यात कौटुंबिक नाते तयार झाले . त्यातूनच मग कुटुंबात होणारा संवाद संत आणि
देवामध्ये झालेला दिसून येतो . जिव्हाळय़ाच्या नात्याने सलगी
झाल्याने देवाविषयीचे भय नाहीसे होऊन तिथे
प्रेमभाव वाढीस लागले. देव
कुणीतरी महान आहे. त्याला दूरून नमस्कार केला
पाहिजे . त्याची भक्ती केली
नाही , त्याचा अनादर केला तर त्याचा कोप होईल, ही
देवाबद्दलची भयानक भीती
समाजमनावर होती ती
भीतीच नामदेवांनी घालवून
टाकली . देव हा कुणी दूरचा , परका नसून तो आपला
सखा आहे , सोबती आहे आणि सांगाती आहे हा
भाव त्यांनी रुजविला .
सख्यासोबत्याबरोबर जसा अनेकदा अनुराग होतो आणि त्यातून वादाला तोंड फुटते.
तसा वाद नामदेवांनी अनेक ठिकाणी देवाबरोबर
घातलेला आहे. देवाच्या पतितपावन ब्रीदावळीलाच
नामदेवांनी आव्हान दिले आहे. देवा , तू पतितपावन आहेस म्हणून
तुझ्या द्वारात आलो. परंतु त्याची
कुठलीही लक्षणं तुझ्यामध्ये दिसत नसल्यामुळे
मी इथून माघारी जातो. तूझे
औदार्यही खोटे आहे, असे सुनावताना नामदेव महाराज म्हणतात ,
` घेशी तेव्हा देशी ऐसा असशी
उदार।
काय धरू देवा तुझे कृपणाचे द्वार `
नामदेवांच्या गाथ्यात अनुरागाने भरलेले अनेक अभंग पहायला मिळतात.
नामदेवाचीच ही धिटाई त्यांच्या घरी
राहणाऱया जनाबाईमध्येही आली . जनाबाईचा अनुराग
तर नामदेवांच्या पुढच्या पायरीवर गेलेला होता .
नामदेवांनी फक्त आपली नाराजी
व्यक्त केली . जनाबाईने थेट देवाच्या विरोधात बंड पुकारून
कडकडीत शिव्या दिल्या .
अरे विठय़ा विठय़ा विठय़ा। मूळ माईच्या कारटय़ा।
तुझी रांड रंडकी झाली। जन्म
सावित्रा चुडा ल्याली।।
अशा शब्दात देवाला तिने खडसावले . अर्थात ही धिटाई केवळ
नामदेवांच्या संगतीत असल्यामुळेच तिला शक्य
झाली .
नामदेवांना भगवंताशी असलेल्या लडिवाळ नात्यापुढे इतर
कशाचीही फिकीर
नसायची . देवाशी असलेल्या त्यांच्या
जवळीकीची इतर
संतांमध्येही चर्चा होती . देवाचा इतका लाडका भक्ता
असणाऱया नामेदवाशी भेटावे, त्यांच्याशी चर्चा
करावी , असा मोह सर्वच संतांना व्हायचा. परंतु देवाच्या
सानिध्याशिवाय इतर कशातही नामेदवांना सुरुवातीला
रस नव्हता. नामदेवांची कीर्ती
ऐकून ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडांसह पंढरपूरला गेले होते . इतर संत
त्यांच्यासोबत होती . निवृत्तीनाथ,
ज्ञानेश्वरादी संतांनी नामदेव महाराजांना नमस्कार
केला . पण आपण देवाचे लाडके भक्त आहोत या उर्मीतच
तल्लीन असलेल्या नामदेवांनी प्रतिनमस्कार केला
नाही . ही बाब मुक्ताबाईला खटकली.
देवाशी सलगी असल्याचा नामेदवांना अभिमान झाला
आहे, अशी भावना तिच्यामध्ये निर्माण झाली .
त्यातूनच तिने नामदेवांना अत्यंत कठोर शब्दात खडसावले -
अखंड जयाला देवाचा शेजार।
कारे अहंकार नाही गेला।।
मान अपमान वाढविशी हेवा।
दिवस असता दिवा हाती घेशी।।
आपल्या ज्ञानी भावंडांना नमस्कार न केल्याचा राग
जरी मुक्ताबाईच्या बोलण्यातून व्यक्त झालेला असला
तरी नामदेवाला अखंड देवाचा शेजार लाभला, प्रेम मिळाले हे
मुक्ताबाईंनी मान्य केलेले आहे.
नामदेव आणि देवांमधील लडिवाळपणाच्या कथा त्यांच्या चरित्रातून
जशा पहायला मिळतात, तशा त्यांच्या अभंगांतूनही दिसून येतात .
ज्ञानेश्वर महाराजांनी महाराष्ट्र सोडून तिर्थ
यात्रेसाठी भारत भ्रमण करण्याचा निर्धार केला .
त्यावेळी नामदेव महाराजांना सोबत येण्याची
विनंती केली . देवापासून आपल्याला एक क्षणाचा
अंतराय होऊ नये म्हणून नामदेवरायांनी स्पष्ट शब्दात
तीर्थयात्रेला ज्ञानेश्वर महाराजांसोबत जाण्यास नकार दिला .
शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी देवाकडेच
परवानगी मागायला सांगितले . तेव्हा देव आणि नामदेवांचा संवाद
अभंगरूपाने आलेला आहे.
नामदेव महाराज देवाकडे जातात. देवाला सांगतात , ` देवा , ज्ञानेश्वर महाराज मला
आपल्या सोबत येण्याची गळ घालत आहेत . पण देवा
मी तुला सोडून जाणार नाही . मी
तुझ्याशिवाय राहू शकत नाही . मला इतर
कोणत्याही गोष्टीची गरज
नाही . तीर्थयात्रा नको , पुण्य नको , मोक्ष नको
मला कशाचीच गरज नाही . देवा मला केवळ तुझ्या
चरणाच्या सेवेचेच सुख जगातील सर्व सुखांपेक्षा श्रेष्ठ आहे.
मला इतर कोणत्याही मोहात आडकायचे नाही .
त्यामुळे मी ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत जाणार
नाही . यावेळी नामेदव महाराजांचा प्रेमभाव हा करुण
रसाच्या परर्मोच्च बिंदूपर्यंत पोहचलेला दिसतो. मात्र त्याच वेळी
देव नामदेवाला कुरवाळतात आणि सांगतात - नाम्या, अरे तू ज्ञानेश्वरांबरोबर गेलास
म्हणून माझ्यात आणि तुझ्यात अंतर पडणार नाही . कारण
मीच ज्ञानदेव आहे-
देव म्हणे नाम्या पाहे। ज्ञानदेव मीच आहे।।
इतर संतांनी देवाशी संवाद साधल्याचे, करुणा
भाकल्याचे, त्याने प्रसन्न होऊन रक्षण केल्याचे अनेक अभंग पहायला
मिळतात. मात्र देवांनी येऊन त्यांच्याशी संवाद
साधल्याचे अभंग रूपाने फारच कमी दाखले उपलब्ध आहेत .
नामदेव महाराजांच्या गाथ्यात असे दाखले अनेक मिळतात.
विरह भावनेने केवळ नामदेव व्याकूळ होतात असे नाही तर
देवही संतांच्या विरहाने व्याकूळ होतात . आषाढी
वारीच्या निमित्ताने पंढरपूरात आलेले वारकरी जेव्हा
परत आपापल्या गावाकडे निघतात तेव्हा भगवंतही व्याकूळ
होतात . हृदयात दाटलेली विरहाची भावना नामदेवाकडे
व्यक्त करताना देव म्हणतात -
तुम्ही जाता गावा। हूरहूर माझ्या जीवा।
भेटशी केधवा मजला लागी।।
तिन्ही त्रिभूवनी। मज नाही
कोणी।
म्हणे चक्रपाणी। नामयाशी।।
असे गुज देव नामदेवरांशी सांगतात , व्याकूळ होतात .
अशी अभंगरचना नामदेवांच्या गाथ्यात आलेली
आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या
अभंगातही देवाच्या मुखातून निघालेले अनेक उद्गार अभंग रूपाने
प्रकट झालेले आहेत . या अभंगातील देवाचे मनोगत कसे प्रगट
झाले . देव नामेदवांना कधी हे गुज सांगायचे, असे प्रश्न निर्माण
होतात . तेव्हा त्याचे उत्तर हे नामदेवांच्या एकविध भक्तीत
मिळते . प्रेमाने , भक्तीने नामदेव महाराज भगवंतांशी
इतके एकरूप झालेले होते की देव आणि नामदेव हा भेदच उरलेला
नसावा . या भेदाभेदाच्या पलीकडे गेलेल्या नामदेवांच्या मुखातूनच
देवाच्या अंतरीचे बोल प्रगट होताना दिसतात . असा देव आणि
भक्तीचा अतूट भाव नामदेव महाराजांच्या चरित्रात दिसत
असल्यानेच वारकरी संप्रदायने नामदेवाला भगवंतांचा लडिवाळ
भक्त म्हणून संबोधलेले आहे.
चौकट
वारक - यांचे नामदेव
नाचू किर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू
जगी। अशी साद घालीत नामदेव
महाराजांनी वारकरी किर्तन परंपरा सुरू
केली . वारकऱयांनी नित्य
आचारणासाठी जे `नेमाचे भजन` ठरविलेले आहे त्यात नामदेव
महाराजांच्या अभंगांना अत्यंत महत्त्वाचे स्थान
आहे. ` काल्या` ची परंपरा सुरू करून नामदेवांनी
सामाजिक ऐक्याची मुहूर्तमेढ
रोवली . वारकरी संप्रदायाच्या
कोणत्याही महोत्सवाची सांगता काल्याच्या
कीर्तनाशिवाय होत नाही . तसेच
कीर्तन अथवा भजनाचा समारोप नामदेव महाराजांच्या पसायदाशिवाय
होऊच शकत नाही . यावरून त्यांचे स्थान किती
महत्त्वाचे आहे लक्षात येते .
नामदेवपूर्व काळात महाराष्ट्रात नारदीय
कीर्तनपरंपरा प्रचलित
होती . नारदीय कीर्तनपरंपरेत
एकच बुवा निरुपण करायचे. बाकी सर्वांनी फक्त ते
ऐकायचे. सर्व कारभार एकहाती होता . इतरांना त्यात स्थान
नव्हते. नामदेवांनी वारकरी
कीर्तनपरंपरा सुरू करून
कीर्तनातील प्रत्येक व्यक्तीला
त्या कीर्तनाचा भाग बनविले . त्यात
टाळकरी , गायक , वीणेकरी , मृंदगमणी
यांचा प्रत्यक्ष सहभाग असतोच . पण खाली
बसलेली व्यक्तीही
टाळी वाजवून त्या कीर्तनात साथ
करीत असते. यात सर्वांना सारखे महत्त्व असल्याचा भाव
रुजविण्याचा हेतू असावा . यात नामदेवांनी मोठी
सामाजिक समता साधल्याचे दिसून येते .
इतकेच नव्हे तर स्त्रियांचा आदर करण्याची
भावनाही त्यांनी वाढीस
लावली . पंढरीच्या वाळवंटात
नामदेवांनी सर्व संतांना निमंत्रित केल्याचा एक प्रसंग आहे. त्यात
ज्ञानेश्वर , निवृत्तीनाथ , सोपनकाका , मुक्ताई यांच्याशिवाय गोरोबा
काका , उत्तर प्रदेशातून खास कबीर त्या संत मेळय़ाला आले
होते . या संपूर्ण संतसंमेलनाचे नेतृत्व करण्याची
जबाबदारी नामदेवांनी आपल्या घरात
दासीचे काम करणाऱया जनाबाईकडे दिले होते . त्यात
कुणी कीर्तन करावे , कुणी अभंग
म्हणावा, कुणी भजन करावे याचे आदेश जनाबाई देत
होती याचा पुरावा जनाबाईच्याच अभंगात मिळतो. जनाबाई म्हणते-
नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग।
जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग।।
ज्ञानेश्वर महाराजांना आदेश देताना जनाबाई सांगते , आता नामदेव
कीर्तन करणार आहेत . ते कीर्तन इतकं रंगतं
की स्वत: पांडुरंग त्यात किर्तनात नाचतात . ज्ञानेश्वर महाराज
तुम्ही अभंग म्हणा. दासीचे काम करणाऱया
महिलेला संतसंमेलनाचे नेतृत्व करण्याची
जबबादारी देऊन केवढी सामाजिक
समतेची नांदी नामदेव महाराजांनी
घातली होती हे दिसून येते .
काल्याच्या प्रसंगातून अशाच समतेचा विचार त्यानी रुजविलेला
आहे. त्यांनी पहिला काला केला तेव्हा परिसा भगवत या
ब्राह्मणांकडून दही आणले , गोरोबा काका कुंभांराकडून मडके
आणले , चोखा महारांच्या घराच्या लाह्या आणल्या. वेगवेगळय़ा
जातीतील संतांच्या घरातून आणलेल्या वस्तू
एकत्र करून त्याचा ` काला ` केला . त्यातून सर्वांना समान हक्क
असल्याची भावना दिसून येते . ही भावना
वाढीस लागावी यासाठी
कोणत्याही वारकरी महोत्सवाची
सांगता `काल्या `ने करण्याचा दंडक घातला . आजही सर्व
वारकरी तो पाळतात .
वारकरी संतांच्या नित्यनेमाच्या भजनात नामदेव
महाराजांनी वेगवेगळय़ा प्रकरणात लिहिलेल्या अभंगांना अनन्य
साधारण महत्त्व आहे. त्यात
बाळ्क्रीडा , तीर्थावळी, समाधी, नाटाचे
अभंग यांचा समावेश आहे. नामदेव महाराजांनी पांडुरंगाला
आळविणाऱया करुण रसातील अभंगाशिवाय
काकडय़ाची सांगता होत
नाही . गवळणी , वासुदेव , आंधळा , पांगळा या
प्रकारात मोडणारी अभंग रचनाही
वारकरी भजनात महत्त्वाची ठरते. वारकऱयांचे
भजन असो अथवा कीर्तन , त्याची सांगता नामदेव
महाराजांच्या ` अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा ` या पसायदानाशिवाय होऊच
शकत नाही .
No comments:
Post a Comment