आपला देश हा तरूणांचा, युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशातील युवकांकडे सहज निखळ मनाने पाहिले तर त्यांची वाटचाल दोन दिशांनी चालू आहे. एक म्हणजे प्रगती, तर दुसरी म्हणजे व्यासनाधिनता. खरच जो देश युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. अशा देशातच जर तरून चांगले कार्य करायचे सोडून जर वाईट प्रवृत्तीकडे जात असतील तर ही बाब नक्कीच आपल्या देशासाठी लज्जास्पद आहे. आजचे तरूण हे वाईट प्रवृत्तीकडे जात आहेत. किंवा त्या प्रवृत्तीचे आहेत असे मुळीच नाही. आहो आपल्या देशामध्ये आज ही काही तरूण डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद याचे विचार डोक्यात घेऊन व डॉ.ए.पी.जी.अब्दूल कलाम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण घेत आहेत,काम करत आहेत.
तरूंणामध्ये सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या खूप आहे. मग आपण ऐवढे शिक्षण घेऊन सुद्धा स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही. शिक्षण खूप घेतले याचा त्या तरूणाला अभिमान असतो, मात्र याचा फायदा (म्हणजे नौकरी वगैरे न मिळने) झाला नाही म्हणून तो नाराज असतो. मग त्याला समाज चिडवतो आणि समाज चिडवत असल्यामुळे त्याला स्वतःचा राग येतो अन् तो वाईट प्रवृत्तीकडे वळतो आणि व्यसनाधिन बनतो अशा अनेक घटना आपल्या देशामध्ये घडलेल्या आहेत. ज्या युवकांमध्ये देशात बदल घडवून आणण्याची शक्ती आहे. आज तोच युवक व्यसनाधिन बनत चालला आहे. त्यामुळे व्यसन ही एक युवकांसाठीच नव्हे तर देशांसाठी समस्या बनली आहे.
युवक व्यसनाधिनतेकडे वळण्यासाठी अनेक कारणे आहेत. या मध्ये आपल्या जिवनात मिळत असलेले अपयश, आपल्याला कोणा एका व्यक्तीची साथ न मिळणे या सारखे अनेक छोटी-मोठी वाटणारी पण युवकांच्या मनावर घातक परिणाम करून त्यांना व्यसनाधिनतेकडे वळवणारी अनेक कारणे आहेत. आपल्या लक्षात येण्यासाठी एक छोटस उदाहरण म्हणजे चार दिवसांपूर्वीच सुनिल व राजेश भेटले. दोघेही जिवलग मित्र. त्यांच्या चेह-यावरचे हस्ये पाहून नक्कीच काहीतरी गुडन्युज असणार असे वाटत होते.आणि हो खरचं गुडन्युज होती.

आत्तापर्यंत पहिलीच्या वर्गापासून अगदी डॉक्टरकीचे शिक्षण घेईपर्यंत दोघेही सोबतच. दोघे ही एकाच वर्गात. दोघांचेही विचार एकच. दोघेही एम.बी.बी.एस.ची डीग्री घेऊन बाहेर पडले. तसे दोघेही हुशार.पण ! सुनिल राजेश पेक्षा काही प्रमाणात नेहमिच सरस असायचा. आता सुनिलच्या मनात आपण ऐखादे हॉस्पीटन सुरू करावे हा विचार. तर राजेशच्याही मनात तोच विचार. अखेर सुनिलने आपल्या गावाकडे छोटासा दवाखाना सुरू केला. मात्र राजेश बळी पडला तो वाईट प्रवृत्तीच्या समाजाला. कारण समाजाने त्याचे काण भरून तु मोठे एम.बी.बी.एस. डॉक्टरकीचे शिक्षण घेतले आहेस, तु एखाद्या खेडेगावात दवाखाना चालवने चांगले नाही... या सारखे अनेक गर्वीस्ट विचार राजेशच्या मनात या समाजाने भरवले. आणि तो त्याला बळी पडला. सुनिल ने सुरू खेड्यात सुरू केलेला दवाखाना याला उत्सपुर्त प्रतिसादही मिळत होता. आणि त्याचा सरावही होत होता. पाच वर्ष उलटून गेली पण राजेशने आणखी स्वतःहाचा दवाखाना उभा केला नाही. तर इकडे सुनिलच्या दवाखान्याने अगदी गरूडझेप घेतली होती. मग पुन्हा तोच समाज राजेशच्या मनात चित्र-विचीत्र विचार आणून द्यायला लागला. सनिलच्या दवाखान्याकडे पाहून राजेशला जळन व्हायला लागले. ऐकीकडे राजेशचा दवाखाना देखवत नव्हता आणि दुसरीकडे समाजाकडून होत असलेले खच्चीकरण याचा परीणाम झाला तो राजेशच्या मनावर आणि त्याच्या आयुष्यावर. त्याचा याला मोठा माणसीक धक्का बसला. अन् तो व्यसनाधिन बनला. आज जे दोन मित्र एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेऊन बाहेर पडले त्यातील एकाने स्वतःच्या मेहनतीवर आणि निर्णयावर मोठा दवाखाना उभा केला तर दुसरा हा समाजाच्या वाईट प्रवृत्तीच्या विचाराला बळी पडला. आज सुनिल हा एसीमध्ये बसला आहे तर राजेश दारू पिवून रस्त्यावर लोळत आहे. अहो का झाले हे? कसे झाले? हे आपणाला यावरून नक्कीच समजले असेल.
आज जर आपण स्वतःचे निर्णय स्वताहाच घेतले तर आपण काही प्रमाणात का होईना नक्कीच यशस्वी होऊ. मात्र आपल्या मनात जर कोणी वाईट विचार भरवले तर मग आपले आयुष्य बिघडायला काहीच वेळ लागणार नाही.आहे आज असे अनेक राजेश सारखे सुशिक्षीत बेरोजगार तरूण आपल्या देशामध्ये सुशिक्षीत बेरोजगार युवकांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात आहे. शिक्षण घेऊन ही आपल्याला नोकरी न लागने किंवा स्वतःच्या पायावर उभे न राहता आल्यामुळे आज अनेक युवक व्यसनाधिनतेकउे वळत आहेत.एका सुशिक्षीत बेरोजगार असलेला युवक दारू पिऊन रस्त्याने जात असताना त्याच्या तोंडून नकळत काही शब्द, ते म्हणजे
कधी वाटते नकोच सुटका
आयुष्याच्या प्रवासातूनी,
पायामध्ये वादळ घेऊनी
पुन्हा-पुन्हा भटकावे म्हणतो...
युवकांची व्यसनाधिनतेकडे वळण्याची सुशिक्षीत बेरोजगारी, गरीबी,गर्व, यश न मिळणे, नेहमिच अपयशाला सामोरे जाणे या सारखे अनेक कारणे हे युवकांना व्यसनाधित बनवत आहेत. अहो आपल्या देशाची ‘ शान’ च तरूण आहे. आजचे तरूण हे देशाचे उद्या आधारस्तंभ आहेत. जर तरूणच व्यसणाधिन बनत चालले तर आपल्या देशाचा काय विकास होणार? कोण करणार? अन् कधी करणार? यासरखे अनेक प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाहीत. आज पाच वर्षापासून ते बाविस वर्षापर्यंत व्यसन करणा-या युवकांची संख्या ८० टक्याच्या वर आहे. व्यसनमुक्तीचे संदेश दिले, जनजागृती दिली. दवाखाने उघडले मात्र याचा परिणाम आजही आपल्या भारतीय युवकांवर झालेला नाही. त्यामुळेच ही वाटती व्यसनाधिनता युवा वर्गाला वाईट प्रवृत्तीकडे घेऊन जात असल्यामुळे ही एक मोठी समस्या युवकांसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी आहे.
आपल्या देशाचे आधारस्तंभ जर डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन शिक्षण घेत राहिले किंवा काम करत राहिले तर आपला देश सुजलम सुफलम व्हायला वेळ लागणार नाही.